Skip to main content

विज्ञान

होमी जहांगीर भाभा

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 30/10/2011 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते.

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/10/2011 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे.

आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी सोमवार, 24/10/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.

आदित्य ही कादंबरी मी सर्वप्रथम ऑक्टोबर २००० मध्ये वाचली. अरूण हेबळेकर यांच्या अनेक कथा कादंबर्‍या मी त्यापूर्वी वाचल्या होत्या आणि त्यानंतरही वाचल्या आहेत. त्यापैकी जवळपास सर्वच रंजक आहेत पण आदित्यचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की त्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये मी ही कादंबरी एकूण बारा वेळा वाचून काढली आहे. या कादंबरीत असे काय आहे? म्हंटले तर विशेष काही नाही. म्हणजे खटकेबाज संवाद, रोमांचक मारामारीची वर्णने, बोजड तत्वज्ञान, रोमॅंटिक / श्रुंगारिक वर्णन करणारी वाक्ये ही सहसा यशस्वी कादंबर्‍यांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये; पण आदित्य मध्ये यातले काहीच नाही.

छंदपिसाट

लेखक रम्या यांनी रविवार, 16/10/2011 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
पाचवी सहावीला असताना भुगोलाच्या पुस्तकातील शेवटचा पाठ खगोलशास्त्राचा असे. त्यामध्ये आकाशातील ग्रह तारे यातला फरक कसा ओळखावा, गुरू, शनी यांच्या रंगामध्ये कशा वेग वेगळ्या रंगांची झाक असते, ध्रुव तारा, सप्तर्षी कसा ओळखावा, अशी बरीच माहीती होती. मुंबईच्या सदानकदा फटफटल्या सारख्या दिसणार्या आकाशात मी हे सगळे पाहण्याच्या प्रयत्न करत असे. पण काहीच ओळखता येत नसे. कधी कधी कुठल्याही तार्याला हा गुरू, तो शनी असा गैरसमज करुन घेत असे. एका रात्री तर उंच विजेच्या तारांवर अडकेल्या पंतंगाच्या तुकड्यावर प्रकाश पडला होता त्यालाच गुरू ग्रह समजलो होतो! एकदा वडिलांनी मला सप्तर्षीची ओळख करून दिली.

डेनिस रिचीला श्रध्द्दांजली

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 14/10/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'C' programming चा जनक डेनिस रिची आज आपल्यातुन निघुन गेला. Unix operating system च्या निर्मीत्तीमध्येही याचा खुप मोठा वाटा होता. Assembly च्या जमान्यात 'C' खरच एक रिव्होल्युशन होते. त्याला श्रध्द्दांजली चेतन