डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!
लेखनप्रकार
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात. एका वेळी ती सांगते की, मी तीन वर्षाचे होते तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला. त्यामुळे मी अजूनही त्यांना घाबरते. त्यावेळी तिच्या निरागस मनामध्ये भावना असते की, बाबा माझ्याशी असं वागले म्हणजे मीच काही तरी चुकले असणार! आणि हळु हळु हे पुस्तक वाचताना आपल्याला एकामागोमाग एक धक्के बसण्याची फक्त सुरूवात होते.
डॉ. वाईसचा अनुभव असतो की, आपल्या आयुष्यातल्या अशा असंख्य भल्या- बुर्या अनुभवांचं इंप्रिंट आपल्या मनावर असतं आणि केवळ ते अवचेतन (अनकॉन्शस) मनामध्ये असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. अनेक गंभीर तक्रारी असलेल्या मनोरुग्णांवर उपचार करणारे डॉ. वाईस कॅथरीनच्या बाबतीत काही करू शकत नाहीत. तिच्या सगळ्या आठवणी समोर येऊन आणि अनेक आठवडे थेरपी होऊनही तिची अस्थिरता काही संपत नाही. तिच्या वागण्यामध्ये अनियमित ताण असतो. अनेक गोष्टींची भिती तिला वाटत असते. तर कधी विमानाला प्रचंड घाबरणारी असूनही ती इजिप्तला जाते. आणि विलक्षण बाब म्हणजे पहिल्यांदाच इजिप्तला जात असूनही तिथे फिरताना तिथल्या गाईडच्या सांगण्यातल्या चुका ती दाखवून देते! कॅथरीन डॉ. वाईससाठी एक प्रश्नचिन्ह बनते. अखेर ते तिच्यावर हिप्नोसिस थेरपी वापरायचा निर्णय घेतात.
(असे इतर लेख माझ्या ब्लॉगवर उपलब्ध- http://niranjan-vichar.blogspot.com/2024/04/blog-post.html )
१९७९ मध्ये ह्या घडलेली ही सत्य घटना आहे! हिप्नोसिस थेरपीमध्ये ट्रान्समध्ये गेल्यावर ते तिला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारतात. एका वेळी ती अचानक वर्णन सुरू करते की, ती शेतावरच्या तिच्या घरी आहे. तिथे अनेक जनावरं आहेत. तो अगदी डोंगराळ भाग आहे. तिच्या कुटुंबियांनी असे असे कपडे घातलेले आहेत. डॉक्टरांना प्रश्न पडतो की, ती तर अमेरिकेत शहरात वाढलेली मुलगी. हे वर्णन कसं काय सांगेल? मग ते तिला प्रश्न विचारून बोलतं करतात. तेव्हा ती सविस्तर वर्णन करते. तो काळही अगदी वेगळा असतो. तेव्हाची वेशभुषा- राहणीमान सगळं वेगळं असतं. मग ते तिला वर्ष कोणतं आहे हे विचारतात. तेव्हा ती सांगते साधारण १६४६! आणि गावाचं नाव व कुटुंबियांची नावं युरोपियन असतात. प्रस्थापित मानसशास्त्र आणि विज्ञानामध्ये शिकलेले डॉक्टर अवाक् होतात. पण मग त्यांना मानसशास्त्रातली पास्ट लाईफ रिग्रेशन ही संकल्पना आठवते ज्यावर त्यांचा काडीमात्र विश्वास नसतो. पण पुढच्या अनेक सत्रांमध्ये त्यांना कळत जातं की, कॅथरीन जे अनुभव सांगतेय ते तिचे वेगवेगळ्या जन्मातले अनुभवच आहेत! तीन वर्षाची असतानाच्या आठवणी जशा मनामध्ये खोलवर जतन केल्या गेल्या आहेत, तशाच पूर्वजन्मातल्या स्मृतीही आहेत. कारण हे वर्णन व आठवणी सांगताना तिचा सूर स्वाभाविक असतो. शिवाय इतक्या खोलवर ट्रान्समध्ये नेल्यावर कोणी खोटं कसं बोलेल आणि बोललं तरी ते कळेल ना.
कॅथरीनच्या बोलण्यातून डॉक्टरांना कळतं की, अनेक जन्मांमध्ये तिला भेटलेले काही जण ह्या जन्मातही तिच्यासोबत आहेत. अगदी ते स्वत:ही एका जन्मात तिचे शिक्षक होते व त्यांच्याबद्दल तिला खूप आदर होता. आणि त्याबरोबर काही खूप नकारात्मक अनुभवही तिला आलेले आहेत ज्याचे खूप गहिरे इंप्रिंट्स तिच्या मनावर आहेत. एका जन्मात ती बुडाल्यामुळे तिला पाण्याची फार भिती वाटते. काही लोकांचे खूप नकारात्मक अनुभव आल्यामुळे ती लोकांसोबत वावरताना भिते. आणि एका जन्मात ती इजिप्तमध्येही राहिलेली असल्यामुळे तिच्या मनात त्याही स्मृती आहेत. अशी सगळी संगती त्यांना लागत जाते. आणि इतक्या वेगवेगळ्या जन्मातल्या आठवणी जशा ती व्यक्त करत जाते, तसे तिचे लक्षणं कमी होत जातात. तिची अस्थिरता कमी होत जाते.
हे सर्व सांगताना ती डॉक्टरांना इतरही काही माहिती सांगते. एका जन्मात तिचा मृत्यु झाल्यावर तिला उन्नत चेतना- मास्टर्स मार्गदर्शन करतात असं ती सांगते. किंबहुना अनेक जन्म- मृत्युच्या चक्रामध्ये असे अनेक मास्टर्स तिला मार्गदर्शन करतात, ह्या जन्मात तू काय शिकलीस व तुला पुढे काय शिकायचं आहे हे सांगतात. इतकंच नाही तर खोलवर ट्रान्समध्ये ती बोलत असताना तिच्या माध्यमातून काही मास्टर्स म्हणजे उच्च चेतना डॉ. वाईसशी बोलतात. त्यांचा बोलण्याचा सूर, अधिकारवाणी, हळुवारपणा ह्यांचं वर्णन त्या पुस्तकातच वाचायला पाहिजे. ह्या मास्टर्सचं सांगणं असतं की, ज्याप्रमाणे एका जन्मात माणूस शिकत पुढे जातो, त्याचे साथीदार मिळतात, त्याच प्रमाणे अनेक जन्मांमध्येही माणूस पुढे शिकत जातो व त्याला अनेक जन्मांमध्ये सोबत असलेले सोबतीही मिळतात- Groups of souls travel together! आणि मग ते मास्टर्स डॉक्टरांना त्यांच्या जीवनातल्याही काही प्रसंगांबद्दल सांगतात. जसं डॉक्टरांचा पहिला मुलगा जन्मानंतर अगदी लगेचच दुर्मिळ आजाराने गेला. त्यांच्या नंतरच्या अपत्याचं नाव त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवलं होतं.
आधी अशा संकल्पनांबद्दल पूर्ण अविश्वास असलेले डॉक्टर आता मात्र हे सत्य नाकारू शकत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष प्रमाण- स्वत:चं उदाहरण मिळालेलं असतं. त्यांचं वैद्यकीय व मानसशास्त्राचं ज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने ते ह्याचा छडा घेतात. आणि मग ह्या दिशेने इतर काही मानसशास्त्रज्ञांनी केलेलं कामही अर्थपूर्ण वाटतं. असं हे अतिशय थरारक अनुभव देणारं पुस्तक. वयाच्या चौथ्या वर्षी स्टेफी ग्राफ रॅकेट हातात कशी घेते, बीथोव्हेन अगदी कमी वयात कसे जादुई सूर निर्माण करतो किंवा अनेक वैज्ञानिक शोध हे स्वप्नावस्थेमध्ये किंवा खोलवरच्या तल्लीन ट्रान्समध्ये कसे लागले आहेत, अशा गोष्टींमधला अर्थही हे वाचताना कळतो! त्याबरोबर जीवन हे एक विद्यापीठ आहे आणि जीवन हे प्रचंड अर्थपूर्ण आणि सखोल आहे ही जाणीव आपल्याला होते. पुस्तकाचं नाव- Many lives, many masters. लेखक- Dr. Brian Weiss. त्यांचे अनेक पोडकास्टस आणि मुलाखतीही युट्युबवर उपलब्ध आहेत.
(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)
वाचने
9279
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
मिपावरील
In reply to मिपावरील by अहिरावण
मी जानकार नाही, म्हणून मला मत
In reply to मी जानकार नाही, म्हणून मला मत by भागो
तुम्ही हे कष्ट घ्यायची जरुरी
In reply to तुम्ही हे कष्ट घ्यायची जरुरी by अहिरावण
चित्रगुप्ताच्या वहीवरून तर
In reply to चित्रगुप्ताच्या वहीवरून तर by भागो
पुढल्या जन्मी गाढव?
In reply to पुढल्या जन्मी गाढव? by अहिरावण
चलो इस बार छोड देता हू. अगले
In reply to मी जानकार नाही, म्हणून मला मत by भागो
भागो...
In reply to भागो... by कर्नलतपस्वी
व्वा. काय कविता शोधून काढली
In reply to व्वा. काय कविता शोधून काढली by भागो
अगदी. एक नंबर
In reply to भागो... by कर्नलतपस्वी
'इथल्या' च्या पलिकडलेही खूप काही असते.
माझी विलक्षण स्वप्ने ... पूर्वजन्माबद्दल असावीत का ?
In reply to माझी विलक्षण स्वप्ने ... पूर्वजन्माबद्दल असावीत का ? by चित्रगुप्त
मनी वसे ते स्वप्नी दिसे.
In reply to मनी वसे ते स्वप्नी दिसे. by कर्नलतपस्वी
>>बाकी पुनर्जन्म वगैरे वर
In reply to >>बाकी पुनर्जन्म वगैरे वर by अहिरावण
शब्दांची कसरत.
In reply to शब्दांची कसरत. by कर्नलतपस्वी
द्या टाळी. आमचा आवडता (खल
In reply to द्या टाळी. आमचा आवडता (खल by अहिरावण
घ्या टाळी......
In reply to द्या टाळी. आमचा आवडता (खल by अहिरावण
घ्या टाळी......
In reply to द्या टाळी. आमचा आवडता (खल by अहिरावण
घ्या टाळी......
In reply to द्या टाळी. आमचा आवडता (खल by अहिरावण
घ्या टाळी......
In reply to द्या टाळी. आमचा आवडता (खल by अहिरावण
घ्या टाळी......
In reply to घ्या टाळी...... by कर्नलतपस्वी
बापरे ! किती त्या टाळ्या !
In reply to घ्या टाळी...... by कर्नलतपस्वी
बापरे ! किती त्या टाळ्या !
In reply to माझी विलक्षण स्वप्ने ... पूर्वजन्माबद्दल असावीत का ? by चित्रगुप्त
स्वप्नं
आणले
चर्चा
In reply to चर्चा by मार्गी
>>>@ अहिरावण जी, मला वाटतं
बाल की साल
बाल की साल
+१