Skip to main content

वाङ्मय

शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 02/12/2008 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते.. माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे! महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे! तात्या.

बेडर!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला सापडले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्याचीच ही संक्षिप्त ओळख..! सुप्रसिद्ध ब्रिटिश वैमानिक, डग्लस बेडर चा जन्म १९१० सालाचा.

निरभ्र

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 25/11/2008 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
झाकोळल्या सावल्यांनी हुंकार असा का द्यावा डोळ्यांतला तुझा तो मज मारवा स्मरावा
कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात... दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी... 'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच.

कष्ट करणार्या " तिला "

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 25/11/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
दाटले डोळ्यांत अश्रू, ते ही कां विकणार तू ? कष्टाची ना इथे ग किंमत, कां मरेमरेतो जगणार तू ? कर्तव्याची देऊन दाने, अशी किती उरणार तू ? पुण्यासाठी करुनी पुण्ये, उरता उरता विरणार तू. जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ? कठोर कर्तव्याची केवळ कांस कां धरणार तू ? ध्यास घेऊनी वसंतऋतूचा सांग कधी झुरणार तू ? मागणारे मागतच असतात, सांग किती पुरणार तू ? याचकांचे विश्व सारे, हात किती देणार तू ?

"चैत्र"

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 20/11/2008 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे. जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल. पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे.

निर्गुण निराकार.......

लेखक अनंत छंदी यांनी बुधवार, 19/11/2008 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
छ्या! आता डोकं ऊठणार! या कमलेश आणि शिरीषचं भांडण कसं मिटवावं बुवा? अरेरे... पलिकडच्या गायन क्लासातही आज पोरं नुसती विव्हळतायत.. एकाचा सूर धड लागेल तर शपथ.. आजचा दिवसच बेकार दिसतो... ए, थांबारे जरा.... कमलेश आणि शिरीष.. जरा धिरानं घ्या की... तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे काय बडबडताय? ए गप...गप्प बस जरा... हे काय? गायनक्लासवाल्या मॆडमनी हा कुठला सूर लावला? हिरना....हिरना... अरे ही तर कबिराची रचना दिसते....बरेच दिवसांपूर्वी कधीतरी कुमारजींच्या आवाजात ऐकलं होतं हे निर्गुणी भजन...

तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/11/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार तो मायभूत खाल्लेल्या शेवटच्या जाफरानी १२० पानाची पिचकारी विमानतळावरच्याच त्या छान छान नी सुंदर सुंदर फ्लोअरवर पऽऽचाककन मारावी की काय असं तात्याला वाटत होतं, पण दारावरच्या करड्या अधिकार्‍यामुळे ते शक्य झालं नाही.. तात्याला अपमान गिळावा तसा तो मुखरस गिळून टाकावा की काय, असंही क्षणभर वाटून गेलं! छ्या! अमेरीकेला जायच्या आधीच अपमान सुरू? 'नाही!

नंदावैनी...!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/11/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!" "राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.." "अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?" "अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते! :) "प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू?