पुस्तकाचं पहिलं पान उघडलं की आपण त्या दुनियेत हरवुन जातो....मेग,ज्यो,बेथ आणि ऍमि या चौघी बहिणी,त्यांचा मित्र लॉरी हे सगळे आपल्या जीवनाचा भाग वाटु लागतात..त्यांचं बालपण,त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणार्या घटना,या सगळ्यात आपण हरवुन जातो....
माझे शालेय जीवन समॄद्ध करणार्या काही पुस्तकांपैकी चौघीजणी या पुस्तकाचा पहिला क्रमांक लागतो...
लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या "लिटिल वुमेन" आणि "गुड वाईफस" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी " हा अनुवाद,प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यानी केलेला हा अनुवाद अतिशय सुंदर आहे.
अमेरिकेत राहणार्या मार्च कुटुंबातल्या च