मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" : निकाल

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! पाचव्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. ह्यावेळच्या स्पर्धेला मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित विषय काहीसा कठीण (abstract) असल्यामुळेही असेल. सदस्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच उत्साहाने मतदान केले. सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा लवकरच घोषित करु. आगामी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल करत असून तो फक्त त्या स्पर्धेपुरताच मर्यादित राहिल. विजेता क्र. १: कंफ्युज्ड अकौंटंट . विजेता क्र. २: मस्तानी Fluffy ह्यावेळी प्रथमच आपल्याला तिसर्‍या क्रमाकांसाठी दोन विजेते मिळालेले आहेत. विजेता क्र. ३: kohalea आणि वल्ली kohalea IMG_8699 वल्ली a

वाचने 9888 वाचनखूण प्रतिक्रिया 27

अत्रुप्त आत्मा 30/12/2014 - 16:02
व्वाह....... मतदान पाहून्च ओळखले होते , की आपला एक निकाल अगदी मॅच आहे.. क.अकाउंट... http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif डोळ्यातून बोलणारी भूक..हेच त्या फोटोचे वैशिष्ठ्य! सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clap-smiley-emoticon.gif

असंका 30/12/2014 - 17:28
इतर वि़जेत्यांचे हार्दिक अभिनंदन.... मी फोटोबद्द्ल जास्त लिहिणे टाळले होते. ती खुमखुमी थोडी जिरवून घेतो.... हा अगदी लकीली मिळालेला फोटो आहे. नवीनच कॅमेरा घेतला होता. धाडस करून गॅलरीत नेलेला. त्या दिवशी मोठी टोळी आली होती माकडांची. मग संध्याकाळी त्या कौलारू घरातल्या आजी येऊन भांडून गेल्या, माकडांना केळी का खायला घालता म्ह्णून!! माकडं सगळी कौलं अस्ताव्यस्त करून गेली त्यांच्या घरावरची. (खुलासा: केळी आम्ही खायला घातली नव्हती.) माकडीण एकटीच केळं खात बसली होती. हताश पिल्लू: . माकडं फार उचापती होती. त्यामुळे मी पूर्ण वेळ नव्हतो तिथे. पण शेवटी काहीतरी खायला दिलं असावं- कारण- जादू की झप्पी: . मी मागे आनंद या विषयावरच्या छायाचित्रण स्पर्धेतही भाग घेतला होता.( आंबा हातात धरून तोंड फाटेपर्यंत हसणारी छोटी मुलगी- तो फोटो माझ्या वडलांनी काढला होता.) योगायोग बघा: दोन्ही फोटो पिल्लांचे...दोन्ही फोटो खाण्याच्या संदर्भातले. पण आदमी का पिल्लू आनंदी; आणि बंदर का पिल्लू भुकेला! :-(

असंका 30/12/2014 - 17:35
सर्व मिपाकर प्रतिसादकांचे हार्दिक आभार! विशेष करून पहिले मत देणारे गुर्जी ते शेवटचे मत देणारे पैलवान यांचे ! ;-)

असंका 30/12/2014 - 17:35
सर्व मिपाकर प्रतिसादकांचे हार्दिक आभार! विशेष करून पहिले मत देणारे गुर्जी ते शेवटचे मत देणारे पैलवान यांचे ! ;-)

बोका-ए-आझम 30/12/2014 - 23:17
फोटो निव्वळ अप्रतिम! भूक ही एक आदिम भावना आहे आणि ती नेमकी कॅमे-यात पकडल्याबद्दल सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

मोहन 31/12/2014 - 10:58
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचेही अभिनंदन.

हुकुमीएक्का 31/12/2014 - 14:34
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. तसेच स्पर्धा आयोजकांचे आभार.

मस्तानी 31/12/2014 - 18:37
धन्यवाद ! दुसरा क्रमांक मिळेल असं वाटलं नव्हत त्यामुळे good surprise :) प्रथम आणि तृतीय क्रमांकांची छायाचित्रे मला स्वतःला खूप आवडली होती. तुम्हा तिघांचेही अभिनंदन !!