Skip to main content

संस्कृती

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 25/04/2010 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे.
काव्यरस

शंकर (जयकिशन) यांची पुण्यतिथी- पुण्यात अनौपचारिक मैफल

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शनिवार, 24/04/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २६ एप्रिल रोजी श्रेष्ठ संगीतकार शंकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आज संध्याकाळी पुण्यात माझ्या एका परिचितांच्या घरी एक अनौपचारिक मैफल आयोजित करण्यात आली आहे. शंकर- जयकिशन विषयी थोड्या-बहुत गप्पा, हौशी एस्.जे फॅन्सचे गायन वा वादन असे काहीसे स्वरूप असेल. अश्या प्रकारची मैफल त्यांच्या घरी अठ्ठ्याऐंशी सालापासून (शंकरच्या निधनाच्या पुढिल वर्षापासून) होत आहे. इच्छूकांनी माझ्याशी व्य नि वा मोबाईलवर संपर्क साधावा. सर्व जुन्या हिंदी गाण्यांच्या व शंकर- जयकिशनच्या फॅन्सना हार्दिक आमंत्रण!

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

नॉनसेन्स!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

दीन दयालु रामा : येशुदास व गायत्री

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 14/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामाच्या नावासरशी त्याच्याविषयीची अनेक गाणी, अनेक कथा, त्याची अनेक रूपे नजरेसमोर येतात. प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे निमित्त करून अनेक चित्रपटकारांनी आपल्या चित्रपटाच्या कथानकात अप्रत्यक्षपणे रामाचा आदर्श ठेवून, किंवा त्याला पूजनीय मानून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करणारे नायक दाखवले. त्या प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचं, कौटुंबिक सौहार्दाचं, केरळच्या नयनरम्य हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवणारं हे अजून एक गाणं..... येशूदास व गायत्री अशोकन् यांनी गायलेलं....रवींद्रन् यांनी स्वरबध्द केलेलं.... मामुट्टी ह्या समर्थ अभिनेत्यावर चित्रित केलेलं......

वळखा पाहू

लेखक बाबुराव यांनी बुधवार, 14/04/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावगाडा म्हणल्यावर गाणी, म्हणी, उखाणी, त्या इषयाला काय कमी नाय. आन उखाणा कोड्यासारखा असला तर लय मजा. आज काही कोड्यासारखी उखाणी घालतो . तुम्हाला ठाव असल तर तुम्हीबी उखाणे टाका. पर उखाण्यामधी कोडं असलं पाह्यजेन. उखाण्याचं उत्तर धाग्यामधीच द्यायचं. ज्याच उत्तर बरुबर राहीन. त्याच्या खरडवहीत 'शाब्बास' असे लिव्हल्या जाईन याची गावकर्‍यांनी नोंद घ्यावी. :) १) रंग नाही रुप नाही आभाळ म्हणशील काय ? आदी नाही अंत नाही देव म्हणशील काय ? भूत नाही, देव नाही, विचार करतोय काय ? सांग मला काय ते, नाही तर येथून जाय.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

मोनालिसाच्या बहिणी ?????

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 10/04/2010 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे अगदी लहानपणापासून संगीताचे बरे-वाईट संस्कार कळत नकळत घडत जात असले, तरी तसे चित्रकलेच्या बाबतीत मात्र होत नाही...... जगातल्या थोर चित्रकारांनी रंगवलेली काही चित्रे निदान डोळ्यांखालून जावीत, हा या धाग्याचा हेतु..... मोनालिसाच्या या बहिणी.....

(या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 10/04/2010 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच अन्य स्थळावर एका धाग्यात मी काही प्रतिसाद लिहिलेला असताना अचानक 'कंपू तुमचा पाठलाग न करो ही प्रार्थना' अशी धमकीवजा सूचना आली. मी भांबावलो. त्याच धाग्यात आधी मी औद्धत्य करून कंपूबाजीला आव्हान देतोय असं प्रश्नवजा विधान आलं होतं तेही दिसलं. तेव्हापासून ही भाई लोकं नक्की काय म्हणत असावेत याविषयी मनात विचार सुरू झाले. (त्यातूनच मूळच्या उत्कृष्ट काव्याचं विडंबन, केवळ भीतीपोटी झालं म्हणून कवीची क्षमा मागतो.) पुन्हा, अन्य स्थळावर हे मी अधोरेखित करतोय. मिपावर कंपूबाजी वगैरे काही नाही.
काव्यरस

शिव शिव जय हो!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 09/04/2010 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. हलके हलके झापड येऊन त्यांना डोळा लागणार एवढ्यात कसल्यातरी गलक्याने त्या दचकून उठल्या. रस्त्यावरून बऱ्याच बाइक्सचे एकसाथ येतानाचे, हलगीचे आणि कसल्या कसल्या घोषणांचे आवाज येत होते. आत्ता? रात्री साडेबारा वाजता? ह्या लोकांना काही काळवेळ आहे की नाही?