Skip to main content

नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

लेखक अनुप्रिया यांनी मंगळवार, 09/11/2010 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
14 November 2010 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील.

हशा- खास कोल्हापुरी

लेखक रन्गराव यांनी मंगळवार, 09/11/2010 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
संतोष शिंदे ह्या कलाकराच्या हास्य सम्राट ह्या कार्यक्रमातील ह्या दोन चित्रफिती १. पुरूषप्रधान संस्कृती - http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M २. कोल्हापुरी भाषेची वैशिष्ट्य- http://www.youtube.com/watch?v=nPYkO4Tj9M0

दिवाळी किल्ला - किल्ले राजगड !!!

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 09/11/2010 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीतील इतर गोष्टींबरोबर किल्ला बनवणे हा की एक आनंदाचा भाग असतो. सांगलीतील कलाकार - आदित्य आणि श्रीराम ओगले यांनी बनवलेला हा राजगड आपल्याला कसा वाटला ते सांगा अमोल केळकर ----------------------------------------------- मला इथे भेटा -------------------------------------------------

सहज सुचलं म्हणून.......

लेखक अनिल आपटे यांनी सोमवार, 08/11/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते. त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते.

मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे..

दिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/11/2010 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला
आज दिवाळी पाडवा. सकाळी आमच्या राणाप्रताप चौकात सारेगम फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासमावेत सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन चातक गृपने केले होते. दमदार आवाजांच्या गायकांनी अन तडफदार वादकांनी एक वेगळीच अनुभूती दिली. अन त्या सुरांवर पाषाणाचेही मन डोलू लागले.

***काही क्षण दिवाळीचे***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 06/11/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
नागोबा... मुलांचा आवडता प्रकार.गोल काळ्या वडीला फुलबाजी टेकवताच नाग बाहेर पडायला लागतो...( याचा वास भयानक असतो मात्र !!! :( ) फुलबाजी फिरवण्यात मग्न असलेली चिंटी.

मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

लेखक दशानन यांनी शनिवार, 06/11/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या.

जागतीक रंगभुमी दिन

लेखक रंगकर्मी यांनी शुक्रवार, 05/11/2010 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक यांना जागतीक रंगभुमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
( दिवाळीच्या धामधुमीत सर्वानाच या दिवसाचा विसर पडणे साहजीकच आहे , तो पडु नये ही रंगकर्मी .कॉम ची जबाबदारी आहे . म्हणुन हा एकोळी धागा )

दिवाळी

लेखक पारा यांनी शुक्रवार, 05/11/2010 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझा प्रथम प्रयत्न, चु.भू.दे.घे प्रकाशाची झळाळी | आनंदाची रांगोळी | मनोहर दिवाळी | वर्णू किती || दिव्यांची आरास | पणत्यांचा प्रकाश | मनीचा उल्हास | वर्णू किती | लक्ष्मीचे स्तवन | भक्तीने पूजन | अवस्था उन्मन | वर्णू किती || फटाक्यांच्या लहरी | आकाशाच्या अंतरी | दैदिप्यमान नगरी | वर्णू किती || गोड नि तिखट | फराळाचे ताट | चवींचा थाट | वर्णू किती || प्रकाशाचा सण | संस्कृतीचे भूषण | प्रयत्नांती वर्णन | अशक्य ते || ह्याहून अधिक काही सुचले नाही. कृपया गोड मानून घावे :)