Skip to main content

संस्कृती

आरती सप्रेम..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 02/12/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे." अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या सोसायटीत हे असले एकेक नग आहेत. "आरती ना, कधीं म्हणून होतें का ती साडेंनवाच्या आधीं? तूं जेवांयस वाढ तोंवर. मग जातों सांवकाश पावणेंदहा पर्यंत. कसेबसे कर्पूरगौरास आरती ओवाळण्यापर्यंत पोहोचलें असतील तोवर!" हे आमचे आपटेबुवा. "आरत्या म्हणाव्यात तर यांनी" असा यांच्या नावाचा डंका होता!

शब्दान शब्द

लेखक यकु यांनी मंगळवार, 30/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 30/11/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर?

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 28/11/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर? ================================== केतन आणि विनीत शेजारी शेजारी राहत होते. दोघेही लहान असल्यापासून एकत्रच वाढले. दोघेही एकत्रच अभ्यास करायचे, खेळायचे. त्यांच्या आयाही एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या दोघीही एकमेकींकडे वरचे वर जायच्या. केतन आणि विनीत हळूहळू मोठे व्हायला लागले. अभ्यासात केतन जात्त्याच हुशार होता. पण हे विनीतच्या आईस कळलं तरी मनाला पटत नव्हतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी केतन जरा आजारी पडला. विनीतची आई केतनच्या आईकडे जावून सहानुभूती दाखवायची. विचारपूस करायची. पण घरी आल्यावर का कुणास ठावूक तिला किंचित बर वाटायचं.

जाम्भूलाख्यान ची द्रौपदी हरपली....

लेखक स्पा यांनी शनिवार, 27/11/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्‍वास घेतला. पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते.

महाराष्ट्र दर्शन - भाग ४/ "पैठण"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली...... मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी.... बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो.

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 24/11/2010 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस. अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच!

इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/11/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो बाजारात रोज नवनवीन प्रॉडक्ट्स येत आहेत. आपणही येथे काही नवी उत्पादने तयार करायची आहेत. इथे त्यांची झैरात करायची आहे. एकच अट आहे ही प्रॉडक्ट्स इनोव्हेटिव्ह असायला हवीत. एखादे जुनेच प्रोडक्ट नव्या प्रकारे उपयोगात येऊ शकेल , एखादे प्रोडक्ट जुन्याच प्रॉडक्ट्चे नवे व्हर्शन असेल. तर एखादे अगदीच नवे असेल. त्या प्रॉडक्टचे फायदे इथे लिहायचे आहेत. प्रॉडक्टची झैरात करायची आहे. उदा: "पटापट" रीयूजेबल बबलगम. जगात प्रथमच रीयूजेबल बबलगम एकदाच खा महिनाभर वापरा. याचे फायदे महा बचत बबल गमचा खर्च किमान तीस पटीने कमी. दात पाडायच्या खर्चात १०० % बचत टूथपेस्ट च्या खर्चात बचत.