Skip to main content

संस्कृती

नदी

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/07/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती नदी. नाजुकशी चिमुकली, अवखळ. तारुण्याने मुसमुसलेली, सतत ताजीतवानी असलेली. सागराच्या ओढीने सतत धावतणारी. या अखंड धावण्याचा तिला कधी कंटाळा आला नाही. ना कधी ती दमली थकली. सतत वहात रहाणे हा जणु तिचा धर्मच होता आणि सागरा बरोबर एकरुप होणे हा तिचा ध्यास होता. निळ्याशार आभाळाने तिला कधी भुरळ घातली नाही कि आजूबाजूची हिरवीगार वनराई तिचा निच्श्रय कधी मोडू शकली नाही. खोल दरीत स्वतःला झोकुन देताना ती कधी कचरली नाही की मार्गात दगड धोंडे आले म्हणुन ती कधी अडली नाही. त्यांना एक सफाईदार गिरकी मारुन ती डौलात पुढे जात असे. अनेक लहान मोठे झरे, ओढे, तिच्या मधे येउन मिळत असत.

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.

गोल साडीची आधुनिकता

लेखक रामदास यांनी मंगळवार, 03/07/2012 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास हेच मुळी फॅशनच्या दुनियेतील धीट विधान आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील. एकेकाळी मुलगी गोल साडी नेसते या कारणासाठी लग्नं मोडली आहेत. गोल साडी म्हणजे पाचवारी साडी. नऊवारी ते पाचवारी हे सामाजिक स्थित्यंतराचे माप झाले. वाराचे -चाळीस इंचाचे माप-जाऊन पन्नास वर्ष झाली. मोजमाप मीटर-सेंटीमीटरमध्ये सुरू झाले. साडी नव्या मापाने साडेपाच मीटरची झाली.

गुरु...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 03/07/2012 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुरु रे गुरु तो कसा रे असावा...? न चिडता ओरडता,डबलसीट बसावा पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा धरो कान त्यानी जसा मी चुके रे रडो तो ही जर कान माझा दुखे रे उभयता असे प्रेम नसतो दुरावा डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...!
काव्यरस

गुरु पौर्णिमा

लेखक jaypal यांनी मंगळवार, 03/07/2012 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसको लागुं पाय । बलिहारी गुरु आपने, गोविंद दिया बताय ॥" गुरु पौर्णिमेचा हा धागा माझ्या आयुष्यात आलेल्या तमाम गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणुन समर्पीत. मला असंख्य गुरु लाभले पैकी १) माझे वडील , २) माझा मित्र/गुरु सर्वकाही आणि ३) माझे ज्युडोचे शिक्षक यांचा माझ्या आयुष्यावरील प्रभाव मला वाटत मी जिवंत असे पर्यंत कायम राहणार. त्यांच्या शिकवणींची परतफेड कोणत्याही रुपाने या जन्मी शक्य नाही. १) वडिलांकडुन या व्यवहारी जगात व्यवहारी राहुनही परोपकारी कस जगाव हे शिकलो.

पं पं पं पं दारोदार......

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 02/07/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
पं पं पं पं दारोदार पं पं पं पं दारोदार बाईचा सोन्याचा संसारं बाईचा सोन्याचा संसारं तिचा पोरगा लई हुश्शारं त्याची मारुती मोटारं................. सत्तरची अखेर आणि ऐंशींची सुरुवात या सुमारास हे सहल गाणं बरच प्रसिद्ध झालं होतं. होळी, कोजागिरी, सहल वगैरे निमित्ताने जमलेली पोरं रंगात आल्यावर हे गाणं व्हायचं खर. सगळे बोल आता लक्षात नाहीत. पण संजय गांधी आणि त्याची मारुती मोटार हे समीकरण मारुती नावाची गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर यायच्या अनेक वर्षे आधीपासूनच लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं.

गुरूबिन कौन बतावे बाट (दत्त संप्रदाय)

लेखक शरद यांनी रविवार, 01/07/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूबिन कौन बताये बाट (दत्त संप्रदाय) दत्त संप्रदाय फक्त महाराष्ट्रातच आढळून येतो. थोडासा अपवाद म्हणजे गाणगापूरच्या आसपासचा कानडी मुलुख. पण महाराष्ट्रात तो एक प्रमुख पंथ आहे व नवीन पायंडा पहाता तो वाढीस लागला तरी आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. " मी तुझ्या पाठीशी आहे " हा दिलासा बर्‍याच तरुणांना पुरेसा वाटतो असे दिसते. मुंबईतील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात चांगली गर्दी असते. हे लोण इतर शहरात पसरणे सहजशक्य आहे. शिर्डीनंतर साईबाबांची मंदिरे इतर शहरात पसरू लागली आहेत, तसेच. आजच्या तरुण पिढीला याचे आकर्षण का वाटत आहे याचे विवेचन शेवटी करणार आहे. या संप्रदायाची माहिती आज करून घेऊं.

याहू मेलची बनवेगिरी

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 27/06/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी अनेक जण याहू मेल वापरत असतील. याहूचा सध्या एक प्रॉब्लेम झालेला पहायला मिळतो. याहू मेल आय डी वरून अ‍ॅड्रेसबूकमधील सर्वांना जंकमेल किंवा धोकादायक वेबसाइटची लिंक पाठवली जाते. त्या मेलचे शीर्षक 'वर्क फ्रॉम होम', 'करीअर', 'फ्री एज्युकेशन' 'अर्न फ्रोम होम' असे काहीही असते. मेलमधे एक लिंक दिलेली असते. क्लिक केल्यावर कळते की प्रत्यक्षात खरी हायपर लिन्क दुसरीच आहे. सुरुवातीला असे वाटत असे की कुणीतरी मेल हॅक करतो आहे की काय पण आता असा अंदाज आहे की हा उद्योग स्वतः याहूच पैशे घेऊन करीत असावा. तरीही आलेल्या कोणत्याही मेलमधील लिन्कला क्लिक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी.

राजर्षी शाहू महाराज

लेखक अजातशत्रु यांनी मंगळवार, 26/06/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
लोक कल्याणकारी,आरक्षणाचे जनक,बहुजनांचे प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १३८ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य, कर्तुत्व, क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!