Skip to main content

संस्कृती

(नग्न सत्य)

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 29/05/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदर सध्या मिपावरचे लेखन, त्यातील बाष्कळपणा, फालतु ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, निरर्थक काथ्याकुट, बालीश कलादालने, सुमार कथा आणि बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत. डोन्ट डिस्टर्ब !!! :)

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/05/2012 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.

दक्षिणायन

लेखक अमृत यांनी बुधवार, 23/05/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
'एक्कड की सार?' ऑटोवाल्याचे शब्द कानावर पडले तसा मी भानावर आलो. 'सार... मिटरसे चलते सार?' 'हा जुबिली हील्स जाना है चलो' ऑटोत बसलो तसा परत मुसळभार पाऊस सुरू झाला. काल दिवसभरापासून याने पिच्छा पुरविला होता. २७ तासांचा शिणवणारा प्रवास त्यात कडी म्हणजे तिनहीवेळा जेवणात खावा लागलेला 'राइस', सोबतीला कुणीच नाही आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा घेणारी ट्रेन अरेरे सगळच 'सोनेपे सुहागा'. गेल्या महिनाभरापासून या राइसने नाकी नऊ आणले होते. त्रिवेंद्रमचं एक महिन्याचं ट्रेनिंग कसं पटकन संपलं काही पत्ताच लागला नाही. या काळात ट्रेनिंग कमी आणि संपूर्ण केरळचं टुरिंग मात्र मस्त झालं.

मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/05/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले. इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात. लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात. प्रचंड संख्येने हजर असतात. मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात.

(स्त्री मन)

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 17/05/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/21683 वळवळण्याने तिच्या जाग आली मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके वळवळायला?' शिरली अलगद केसात माझ्या, लागली कचकचून चावायला, कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला, थापटून डोक्याशी थोपटले किंचीत इथे तिथे, राहिचना, शेवटी मस्त खाजवून डोक्यावर, थोपटले जरा मानेवर, जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . . .'अग! डोक्यात उवा झाल्यात माझ्या, शिकेकाईने जरा घासून दे'..
काव्यरस

महेश्वरचा किल्ला: अहिल्याबाई होळकरांचे मूळ दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावरः कुणी वाचवू शकेल का?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 16/05/2012 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या फेब्रुवारीत अहिल्याबाईंच्या महेश्वरास गेलो होतो. अतिशय सुंदर जागा. नर्मदाकाठी किल्ल्यावर अहिल्याबाईंचा वाडा जसाच्या तसा जतन केलेला आहे. मी अनेक वर्षांपूर्वी इथे गेलेलो असताना ज्या स्थितीत किल्ला व गाव होते, जवळ जवळ तसेच अजून असल्याचे पाहून बरे वाटले. मात्र पूर्वी किल्ल्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या अहिल्याबाईं च्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर व सज्जात जाता यायचे, तिथे आता प्रवेश प्रतिबंधित आहे.