Skip to main content

संगीत

कौनो ठगवा नगरीया लूटल हो

लेखक मिडास यांनी शुक्रवार, 06/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा चाललेल्या वाटे वरून पुन्हा चालता येत नाही असं म्हणतात. वाट तीच असते पण आपण मात्र बदलले असतो. तारुण्याचे वयच असतं नविन वाटा तुडवायचं. पण परत त्याच वाटेवरून चालता येईलच असं नाही. आज मागे वळून बघताना हसायला येतं. कालच्या भाबडेपणावर हसावं कि आजच्या निगरगट्ट पणाची कीव करावी कळत नाही. हळवे असतात काही क्षण. भोळे निरागस आणि तितकेच मूर्ख सुध्दा. अशाच एका हळव्या क्षणी मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं "तुझा शेवटचा क्षण कसा असावा असं तुला वाटतं ?" त्या वेळेला का हा प्रश्न विचारला माहित नाही. पण कुठली तरी कविता वाचून शेवटच्या क्षणाबद्दल काहीतरी काव्यात्मक सुचलं होतं हे खरं.

स्ट्रारबॉय

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 31/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ज्या गाण्याने मला वेड लावलं आहे ते म्हणजे स्ट्रारबॉय चे द वि़केंड... या चार्ट बस्टर गाण्याचे संगीत मनात पार घर करुन बसले आहे, तर जगात या गाण्याने अक्षरः धुमा़कुळ घातला आहे ! तु-नळीवर अनेक गाणी ऐकताना,शोधताना एका गाण्याच्या खाली असलेल्या एक प्रतिक्रियेत या गाण्याचा उल्लेख मला दिसला आणि हे गाणे मी शोधले आणि ऐकले. कॅनडा / फ्रान्स / न्यूझिलंड / नॉर्वे / डेन्मार्क / स्विडन / मॅक्सिको / अमेरिका / ऑस्ट्रेलिया इथे या गाण्याने अर्थातच चार्ट बस्ट केले. या गाण्याचे अनेक व्होकल आणि अकुस्टिक कव्हर्स आत्ता पर्यंत केले गेले आहेत / केले जात आहेत...

हा त्याचा 'लास्ट ख्रिसमस' ठरला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 26/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा नव्वदीच्या दशकात जी व्यक्ती इंग्रजी गाणी ऐकत असेल तिला जॉर्ज मायकल हे नाव अपरिचित असणं शक्य नाही. काहीसा पॉप, डान्स किंवा डिस्कोचा बाज असलेली या गायकाची गाणी अतिशय प्रसिद्ध झाली. १९८७ ला आलेला त्याचा पहिला म्यूझिक अल्बम फेथ. याच्या २ अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तिथपासून अनेकवेळा आपल्या गाण्यांमुळे किंवा इतर वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. २५ जून १९६३ रोजी लंडनमधे जन्मलेला, ३० वर्षाची सांगितिक वाटचाल केलेला हा कलाकार काल म्हणजेच २५ डिसेंबर २०१६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.

आठवणी दाटतातः आठवणीतली गाणी

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 26/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझ्या घरी गाण्याचे शौकीन जरी कोणी नसले तरी रेडिओच्या कृपेने दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीतमय व्हायचा. आमच्या चाळीत तेव्हा जेमतेम एका बि-हाडात टीव्ही असेल. तोही आजच्यासारखा २४ तास नव्हता. शिवाय तो बघायचा म्हणजे त्याच्यासमोर बसावं लागे. त्यापेक्षा रेडिओ छान वाटायचा. समोर नसला तरी ऐकू येणाऱ्या गाण्यांमुळे त्याचं अस्तित्व जाणवायचं.

दिल जलता है तो जलने दे

लेखक शरद यांनी शनिवार, 24/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
दिल जलता है तो जलने दे दिल जलता है तो जलने दे आँसू ना बहा फ़रियाद ना कर तू परदानशीं का आशिक़ है यूँ नाम-ए-वफ़ा बरबाद ना कर मासूम नजर के तीर चला बिस्मिल को बिस्मिल और बना अब शर्म-ओ-हया के परदे में यूँ छुप छुप के बे-दाद ना कर हम आस लगाये बैठे है तुम वादा करके भूल गये या सूरत आ के दिखा जाओ या कह दो हमको याद ना कर मुकेश परदानशि--पडद्यातील स्त्री, शालीन, आशिक-- प्रियकर, वफा ---प्रेम, भक्ती, एकनिष्ठा मासुम ---निष्पाप, बिस्मिल ---घायाळ, प्रियकर, हया --- शरम, लाज बेदाद --- अत्याचार, जुलूम, ऑंस ---दर्द, संवेदना

रंगभूमी दिन

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

गीतगुंजन २३: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन

लेखक प्रास यांनी गुरुवार, 27/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली. त्यापैकीच एक गीतकार संगीतकार गायक होता जीम क्रोस. जीम लहानपणापासून संगीतात रमणारा असला तरी कॉलेजात दाखल होईपर्यंत त्याने आपल्यातल्या संगीतकार-गीतकार आणि गायकाला फारसं मनावर घेतलं नव्हतं.

सानु इश्क लगा है प्यार दा...

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉगदुवा बरेच दिवसांनी एका गाण्याविषयी लिहावंसं वाटलं. तसं हे गाणं मी बरंच आधी ऐकलेलं आहे. एकदा नव्हे, तर अनेकदा, आणि परत परत. झिंग चढते अशी अनेकदा अनेक गाण्यांची, त्यापैकीच हे एक. a आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते.

Remake of title song of रात्रीस खेळ चाले...

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार्या त्या रातीमधूनी शांत भयाण घरट्यामधले पक्ष्यांचे ते किलबिल गाणे मौन अचानक झाले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. सुन्या सुन्या त्या वाटेवरूनी एकांताला साद घालता नयनी विचित्र भुताटकीचे दाहक चित्र ते दिसले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. पाचोळा तो सैरावैरा वारा हा पिसाट वाहे भयभीत उभे ते झाड पान स्तब्ध ते झाले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. सावल्या त्या मुक्याने हलती भोवताली त्या विणती माया डोहाच्या या खोल तळ्याशी सावट गुढ पसरले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. नि:शब्द तरंग हे उठले अंधार सारे चांदण झाले आकाश रहस्यमय धुक्याला आले विरून गेले रात

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 18/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.