शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो.
माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न!
मिसळपाव