Skip to main content

चक्रव्युह....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 02/09/2022 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता..... २-९-२०२२
काव्यरस

वाचने 1314
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया