प्रवास
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४
सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला.
झपाट्याने पुढे गेलो.
मागच्या आश्रमाच्या पायर्यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.
क्रुझची सफर -- टेक्सास ते मेक्सिको - १
लग्न होवुन एक वर्ष भरभर गेले आणि लग्नाचा पहिला वाढदिवस जवळच आला होता, बायकोला आधी एकदा म्हणालो होतो कि आपण कधीतरी क्रुझ वर फिरायला जावु. आता अस बोललोच होतो आणी काहीतरी वेगळे म्हणुन विचार केला कि लग्नाचा पहिला वाढदिवस क्रुझ वर साजरा करुयात.
एका मित्राच्या अनुभव आणी सल्ल्यानुसार, दोन एक महीने आधिच चौकशी सुरु केली. ठरवलेल्या दिवशी ऑफिसमधुन सुट्टी भेटायची पण खात्री नव्हती. विचार केला जे होईल ते बघता येईल, आधी बुकींग करुन टाकुत. लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध आणी कार्नीवलची गॅलव्हेस्टन -- प्रोग्रेसो -- कोझुमल -- गॅलव्हेस्टन अशी पाच दिवसांची सफर बुक केली.
नर्मदा परिक्रमा - पुस्तकांची एकत्रित माहिती
नर्मदा परिक्रमा विषयावरचे यशवंताचे रसाळ लेखन वाचले.
मग थोडी शोधा शोध केली तर ही माहिती हाती लागली. आशा आहे कुणाला तरी उपयोग होईल.
नर्मदा परिक्रमा- इतिहास
सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर सुरू होते.
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे.
स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आले आहे असे म्हणतात.
पायी केल्यास ही यात्रा 3 वर्षे 3 महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे.
ही यात्रा अतिशय खडतर आहे.
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.
स्वर्गमंडप...........खिद्रापूर !
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.रंग बदलणारा सरडा.
हा सरडा लोहगडावर दिसलेला.
प्राणी, पक्षी आणि निसर्ग..
राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..)
सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल..
त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अॅटीट्युड कळून येईल..
भालदार फेस (माहुली )
पहिल्याने भालदार फेसचे फोटो बघितले तेंव्हा हा समिट होणार नाही याचा अंदाज होताच. क्लायंबिंग ग्रेड-३ पिनॅकल आणि त्यातून अंगावर येणारे ओव्हरहँग म्हटल्यावर आणखीन काय होणार ? पण तरीसुद्धा अटेम्प्ट करायचा हे पक्कं ठरवलं होतं. नुकत्याच केलेल्या तेल्बैल्याच्या समिट्मुळे बर्यापैकी कॉन्फिडन्स गाठीशी होताच. मी, यतिन नामजोशी, मनोज धारप आणि राजेश पाटील चौघांनी रात्री ३ च्या सुमारासच माहुली माथा गाठला. तीनेक तासांची झोप घेतली आणि उजाडल्यावर नाश्ता करुन डायरेक्ट रॉक फेसच्या खाली धडकलो. यतिन पहिल्या लेज पर्यंत जाणार याची सगळ्यांना खात्री होतीच. त्यामुळे आधी राजेशने आणि मी अटेम्प्ट करावा असे ठरले.
मिसळपाव