Skip to main content

प्रवास

एक मासा : सुदैवी की दुर्दैवी?

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 14/12/2011 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या औरंगाबाद-वेरूळची जी प्रवासवर्णन मालिका लिहितो आहे त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा. सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, 'इथेच जेवायचे' आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही.

माझं गाव

लेखक स्पा यांनी बुधवार, 14/12/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव मु पो . -नवेघर, आडिवरे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन. बास त्याव्यतिरिक्त आपल गावाला काहीच नाही , हेच मनावर ठसवले गेले होते.पण अचानक तिथल्या घराच्या व्यवहारासंबंधी कोर्टाची बोलणी सुरु झाली, तशी रीतसर नोटीस आमच्या काकांनी पाठवली, काही कागदपत्रांवर आमच्या सह्या आवश्यक होत्या आणि ती संबंधित कागदपत्र मिळवण्याची जबाबदारी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर टाकली. आता गावाला जाणे आलेच. अचानक ठरल्याने रेल्वेने जाण्याचा प्रश्नच नव्हता.

फट्याक

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 25/11/2011 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
"फट्याक" असाच आवाज असावा बहुतेक.. तिथे दिल्लीत वाजला आणि इथे पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले. झालं हाफिसांमधून "लवकर निघा सुरक्षित पोचा" चे निमित्त सुरू झाले. हाफीस बसकडे जाऊ लागलो तर बहुदा अख्खे हाफीस बस कडे जात असावे. चहुकडे अर्धी जनता मोबाईलला अन मोबाईल हा शरीराचा अवयव असल्याप्रमाणे कानाला चिकटलेले होते. "जर आता गेलो नाही तर बहुदा बसेस सुटाच्याच नाहीत, तेव्हा मी निघतोय ती मिटींग ऑनसईट वरून अटेंड करा आणि काम चेन्नई डीसी वाल्यांना करायला सांग. उद्या ऑफीस असेल की नाही सांगता येत नाही. (!!

ट्रक धिना धिन!!

लेखक मोहनराव यांनी सोमवार, 21/11/2011 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला सगळ्यांना हे माहीतच असेल कि आपल्याकडे ट्रक चालक स्वताच्या ट्रकमागे काहीना काही लिहित असतात. मी या अशा लिखाणाचे खूप निरीक्षण करायचो. मला ते खूप आवडायचे. एकदा गोव्याला मित्रांबरोबर जाताना रस्त्यात एक ट्रक दिसला. त्यामागे ट्रकमधल्या साहित्यिकाने बरेच काही लिहिले होते. वरती तो फोटो लावला आहे. मला स्वताला हा ट्रक चालक नेहमीच एक भावनिक, विचारवंत आणि एक कवी मनाचा वाटत आला आहे.

सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 18/11/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय... तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्‍या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय.. तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..) शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे.