Skip to main content

प्रवास

कासचे पठार आणि आमचं हे वरातीमागुन आलेलं घोडं

लेखक झकासराव यांनी सोमवार, 14/11/2011 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ... कासच पठार अफाट आहे.

कमळगड

लेखक केदार बर्वे यांनी शनिवार, 05/11/2011 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, शुक्रवारी साधारण सकाळचे १०:२० झाले असतील, डेस्क वरचा फोन वाजला नाव आले "XYZ" Calling माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहून माझ्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्याच्या लगेच लक्षात आले कोणाचा फोन आहे, तो हळूच "Best of Luck" म्हणाला, मी फक्त हसलो कारण आता Call वर कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणार आहेत याचा विचार सुरु झाला होता, Hello .........this went wrong ...........SLA ...........blaa blaa ...........!!! call सम्पला (10:47), Call duration - 27 min, आपली नेते मंडळी जशी आश्वासने देतात तशीच काही आश्वासने मी दिली होती आणि नेहमी प्रमाणे वेळ मारून नेली होती :).

महेश लंच होम..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 28/10/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या. एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं. आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय.

मी, कॅन्सल झालेलं रिझर्व्हेशन आणि नुरिया

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 26/10/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीनिम्मित पुण्याहून कोकणात यायचे ठरले होते. वोल्व्होचे आरक्षण करणे म्हणजे छ्या , एरवी ३०० मध्ये नेणारा तो आता ६०० सांगत होता. ह्यापेक्षा मग एशियाड काय वाईट म्हणून एशियाडने जायचे ठरवले. माझी एक मानलेली बहिण कम मैत्रीण जी माझ्याच गावी राहते तिच्या बाबांनी मला सांगितलं की ती एकटी येतेय रात्रीची, दोघ या त्यापेक्षा.ठीक आहे म्हणत तीच पण माझ्याच जोडीला रिझर्व्हेशन करून टाकल, सीट नंबर १३ खिडकी,१४. पणजी गाडी होती. म्ह्टल चला, १० तासांच्या प्रवासात कोणीतरी बडबड करायला आहे,गाणी तरी ऐकून ऐकून किती ऐकणार ?

थँक गॉड इट्स् फ्रायडे..बट नो थँक्स..

लेखक गवि यांनी सोमवार, 24/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
"बेतार योजना और समन्वय स्कंध" असा बोर्ड असलेल्या हपीसात बरोब्बर चौदा वर्षांपूर्वी मी एरॉनॉटिकल रेडिओ लायसेन्सच्या परीक्षेला गेलो होतो. त्यावेळी पाचदहा टक्के पासिंग रेट असलेली ही परीक्षा.. पण तरीही त्यावेळी माझ्यासोबत असलेले सर्व शिकाऊ पायलट मित्र दिल्लीत पोचण्यापूर्वीपासूनच परीक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने वाट पहात होते ती परीक्षेनंतर त्याच संध्याकाळी ठरलेल्या टीजीआय फ्रायडेमधल्या पार्टीची. मी त्यावेळी "घेत" नसल्याने, शिव शिव करुन त्या सर्वांना वसंतविहारमधे "ड्रॉप" केलं आणि तीच गाडी दिल्लीभर फिरवून तीन तासांनी परत त्यांना पिकअप करायला आलो. तेव्हा मोबाईल वगैरे काही सर्वांकडे नसायचे.

हे ssss इथं

लेखक शिल्पा ब यांनी सोमवार, 24/10/2011 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे". ..हे इथच म्हणजे नक्की कुठं?