Skip to main content

मौजमजा

खरी मजा आली ती तोडल्यावर!

लेखक गुंडोपंत यांनी रविवार, 21/10/2007 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/10/2007 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते) http://www.dadazi.net/usa/mahis.swf विकास

लहानपणीचे मिसळप्रेमी

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 10/10/2007 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मध्यंतरी सिने तारकांच्या बालपणीचे फोटो अनेक विरोपातुन आपण पाहिले असतीलच त्याचप्रमाणे मिसळप्रेमी तारे तारकांचे देखिल लहानपणीचे फोटो मिळवण्यास आम्हाला नुकतेच यश आले आहे. काही काल्पनीक आयडींच्या नावाखाली आम्ही ते प्रसिद्ध करत आहोत.. आपणास खरोखरच असे आयडी आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजुन भलतेच हलके घ्यावे!

ढकलेले विरोप अर्थातच इमेल फॉरवर्डस

लेखक कोलबेर यांनी सोमवार, 08/10/2007 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्या सर्वांना ढकलेले विरोप हे येत असतातच. अमक्या अमक्याला कॅन्सर झाला आहे त्याला वाचवायला हवे, ह्याला समर्थन असेल तर इथे पेटीशन साइन करा,हा विरोप आणखी १० लोकांना ढकला आणि चमत्कार पाहा असल्या विरोपांच्या ढीगर्‍यात कधी कधी एखादा फालतु न ऐकलेला मस्त विनोद, एखादं सुंदर चित्र, कविता असं काय काय वाचायला/ पहायला/ऐकायला मिळतं. ह्यातलं जे तुम्हाला आवडलं (आणि सार्वजनिक सभ्यतेच्या शिष्टाचारात बसणारं) असं सगळं इथे बिनधास्त डकवा. आवडलं तर खी खी करू नाही तर सोडून देऊ.

झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

लेखक धनंजय यांनी शनिवार, 29/09/2007 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमाम्यहं सरस्वतीम् ******************* सुशुक्लवस्त्रधारिणीम् सुमन्दहासहासिनीम् । सुतन्तुवाद्यवादिनीम् नमाम्यहं सरस्वतीम् ॥ १ ॥ उमेशसन्निधाम् उमाम् रमेशसन्निधाम् रमाम् । हिरण्यगर्भयोषिताम् नमामि बुद्धिदेवताम् ॥ २ ॥ अगाधवाहिनीम् नदीम् प्रबोधतोयदायिनीम् । मनःसरोजवर्धिनीम् नमामि वेदवादिनीम् ॥ ३ ॥ मुनीन्द्रदेववन्दिते सुबुद्धिदे विशारदे | जडत्वमूढसेवकं हि पाहि देवि शारदे ॥ ४ ॥ ******************* या अखंड स्फूर्ती देणार्‍या विद्यादेवीवर हे इतके स्फूर्तिशून्य गीत कसे रचले त्याचे विच्छेदन सांगतो. झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत) चला मुलांनो, आप

उगवला...चंद्र सुगीचा

लेखक नंदन यांनी गुरुवार, 27/09/2007 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
Harvest Moon [आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.] आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.

असे असायला हवे होते/बहुधा असेच असावे! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 25/09/2007 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, चि वि जोशी हे मराठीतले एक नावाजलेले लेखक. चि वि जोश्यांचे एक पुस्तक आहे. (त्याचं नांव मला आत्ता आठवत नाही, पण आठवून नक्की सांगेन.) त्या पुस्तकात त्यांनी काही धमाल लेख लिहिले आहेत. त्यांचं (म्हणजे चि विं चं) म्हणणं असं की आपल्या संस्कृतीने 'याचक' हाच नेहमी मोठा ठरवलेला आहे. आणि याचकाला दान दिल्यावर किंवा याचकाने दात्याकडून दान घेतल्यावर जणू काही याचकच दात्यावर फार मोठ्ठे उपकार करतो आहे असं चित्र गेली वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीत रंगवलं गेलं आहे.