Skip to main content

मांडणी

बाईकवरचे बिऱ्हाड--लेखक अजित हरीसिंघानी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 01/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला. एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे बाईकवरचे बिऱ्हाड. पुस्तकाचे लेखक अजित हरिसिंघानी हे एक वाचाउपचार तज्ञ आहेत. आणि एन्फिल्ड बाईक चे निस्सिम चाहते किंवा भक्त म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचे एक पेशंट, जेरेमी डिकोस्टा अर्धांगवायूच्या झटक्याने अर्धी बाजू निकामी झाल्यामुळे त्यांच्याकडे उपचाराला येत असत. जेरेमी एका कंपनीचे सीईओ. परंतु त्यांच्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक साधं वाक्य उच्चारणे किंवा काही अंतर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यांना दोन मुलगे परंतु दोघेही परदेशात स्थायिक आणि. जेरेमीची सगळी जबाबदारी त्यांच्या ६० वर्षीय पत्नीवर पडली आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 26/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

Three of Us : एक काव्यात्मक सुंदर अनुभव.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 06/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.

काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.

थंडीतली खाद्ययात्रा.

लेखक आजी यांनी गुरुवार, 28/12/2023 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी हा माझा आवडता ऋतू आहे,असं मी मागच्या लेखात म्हटलंच आहे. थंडीमध्ये आणखीही एक मज्जा असते. ती म्हणजे थंडीतली खाद्ययात्रा! थंडीत सर्वात जास्त मजा असते ती हुरडा पार्टीत. मस्त एखाद्या शेतावर जायचं. शेतात मध्यभागी एक बेताच्या आकाराचा खड्डा खणलेला असतो. त्यात शेणाच्या गोवऱ्या, कोळसे,पेटते निखारे धगधगत असतात. कोवळी ज्वारीची कणसं तोडून ठेवलेली असतात. तिथला शेतमजूर एक बारीक पण मजबूत काठी त्या ज्वारीच्या कणसात खुपसतो आणि त्या शेकोटीत घालतो. सर्व बाजूंनी फिरवून फिरवून कणीस भाजतो. कणीस नीट भाजलं गेलं की ते बाहेर काढून हातावर चोळायचं , आणि कोवळे, भाजलेले दाणे खायचे.

मुझको ठंड लग रही है..

लेखक आजी यांनी मंगळवार, 19/12/2023 या दिवशी प्रकाशित केले.
माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे थंडीचा. पावसाळा आणि उन्हाळा मला अजिबातच आवडत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लोकलनं कामावर जाणं म्हणजे अग्निपरीक्षाच! पावसाच्या तपकिरी रंगाच्या गढूळ पाण्यात काय काय गलिच्छ वस्तू वाहात येतील आणि आपल्या पायाला स्पर्श करतील सांगता येत नाही. कुठं खड्डा असेल, कुठं सरळ रस्ता असेल.रस्त्याची सीमारेषा संपून कुठं गटार लागेल सांगता येत नाही. वाहत्या पाण्यात रस्ता अजिबात दिसत नसताना त्याचा अंदाज घेत चालणं महाकर्मकठीण काम. मला रस्त्यातल्या खड्याची एक महाभयानक आठवण आहे.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 17/12/2023 या दिवशी प्रकाशित केले.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

एक तरी शिवी अनुभवावी..

लेखक आजी यांनी रविवार, 29/10/2023 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते. शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल. सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही.

पुन्हा एकदा म्युचुअल फंड्स

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 27/10/2023 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी हापिसात चहापाण्याच्या वेळी आम्ही नेहमी जागतिक स्तरावरच्या गप्पा मारत असतो. म्हणजे पुतीनला हार्ट अ‍ॅटॅक आला, आता युक्रेन वॉरची पुढची स्टेप काय असेल? किवा बिबीने (आपले नेतान्याहु हो) गाझा मध्ये सैन्य घुसवले, आता पुढे काय? अशा गप्पांचा मोठा फायदा म्हणजे आगामी काळात गाडी बदलायची असेल तर पेट्रोल घ्यावी, सी एन जी की हायब्रिड? सेकंड होम बूक करावे की सरळ प्लॉट मध्ये गुंतवणुक करावी? ईथपासुन ते घरात खाण्याचे तेल कितपत साठवुन ठेवावे? गव्हाचे पोतेच आणावे की नेहमीसारखे ५-५- किलो पुरे?