विविध राष्ट्रांच्या संविधानांतील अपेक्षा आणि धर्मांतील अपेक्षा
धर्मपालन आणी कायद्याचे पालन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत होऊ शकते आणि महत्त्व कशाला द्यायचे याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा निर्णय करताना ए०आय० ने जितकी स्पष्टता दाखवली आहे, तितकी मानवी विद्वान दाखवतील का ही मला शंका आहे. माझ्यामते कायद्याचे पालन धर्माचरणापेक्षा श्रेष्ठ आहे, ते अधिकार देते, तसेच संरक्षण देते.
मिसळपाव
१९ वर्षाच्या एका युवकाने एक नवा इतिहास रचला आहे. बरेच डावे-पुरोगामी त्याच्यावर तुटून पडले आहेत. देवव्रत रेखेने जे मिळवले आहे, त्याचे महत्त्व कमी करण्याचा आटापिटा करताना ते आपला अडाणीपणा आणि ब्राह्मण-द्वेष उघडा पाडत आहेत. उजव्यांच्या अंधप्रेमाबद्दल तर बोलायलाच नको.
’ब्राह्मणांच्या बौद्धिक वर्चस्वाची जीवशास्त्रीय कारणे’ असा एक लेख मी काही वर्षांपूर्वी लिहीला. तो वाचून अनेकांनी नाके मुरडली होती.