मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

“साहेबांचा ताजमहाल”

rahul ghate ·
ऑफिस चे किस्से उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते . अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे.

साथ.

भागो ·
त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती. पण आज सकाळी त्याला नेहमीसारखे प्रसन्न वाटत नव्हते. काय कारण असावे? त्याचे नाव होते राजे. अनंत राजे. जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर. धडधाकट प्रकृती. कधी दवाखान्याची पायरी चढलेला नाही. सकाळची भरभक्कम न्याहारी. न्याहारी न खावीशी वाटावी असं काही नव्हतं. जगण्यासाठी खाणे का खाण्यासाठी जगणे असले तात्विक विचार यायचं वय नव्हते. बाजूच्या टेबलावर दोन तरुणी बसल्या होत्या. पैकी एक ती किंचित काळ्या रंगावर गेली होती. पण तिचा आवाज म्हणजे स्वरांची तान. सिंग-सॉंग. तो तिला नेहमी पहात असे. तिच्या मैत्रिणीसह ती ब्रेकफास्ट करायला येत असे. ओके. ऑर्डर द्यायची वेळ झाली.

कृष्णाच्या गोष्टी-५

Bhakti ·
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली.

कृष्णाच्या गोष्टी-४

Bhakti ·
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

कृष्णाच्या गोष्टी -३

Bhakti ·
*यमलार्जुन भंग क एक दिवस अवखळ कृष्णाला यशोदेने एका उखळीला बांधले. ती कामासाठी इतरत्र निघून गेली. छोटासा कृष्ण उखळीसह अंगणात आला. अंगणातच यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष होते. कृष्ण उखळीसह त्यामधून पुढे निघाला, आकाराने छोटी उखळ झाडाच्या खोडांनाच अडकली.

कृष्णाच्या गोष्टी २

Bhakti ·
वसुदेव आणि देवकी विवाह वसुदेवाचे शौर्य विद्वत्ता शहाणपण पाहून देवकीचे त्याच्यावर प्रेम जडले सर्वांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. खरे पाहता उग्रसेन आणि कंस या विवाहामुळे अस्वस्थ झाले होते. परंतु वधू-वरांना विभोत्तर समारंभ पूर्वक देवदर्शनाला नेऊन व तिथून वधूला वरगृही सोडण्याच्या वरातीत मिरवणुकीत वधू-वरांच्या खास रथाचे सारथ्य स्वतः कंसांनी केले होते. त्याला दाखवायचे होते की आपल्या आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे. कंसाला काही दिवसांनी खटवांग वनात नारद भेटला आणि त्याने देवकीचे आठवे मूल तुला ठार करणार आहे असे भविष्य सांगितले.

पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

नूतन ·
माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत.

गोष्टी कृष्णाच्या १

Bhakti ·
मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात. संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते. फोटो -कृष्णा @मथुरा अ कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा.

डार्कलँड

भागो ·
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते. व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच. पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, “मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.” लोकांना उगीचच थांबायला लावणे यात अवर्णीय आनंद असतो. आपण सगळीकडे थांबत असतो.

द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध

प्रसाद गोडबोले ·
" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो.