ऑफिस चे किस्से
उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते .
अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे.