Skip to main content

कथा

ढासळला वाडा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/05/2020 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ:- ढासळला वाडा - कविता ढासळला वाडा नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता.

मेघाची गोष्टं

लेखक स्टार्क यांनी गुरुवार, 28/05/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
* कथा जुनीच आहे. मिसळपावच्या वाचकांसाठी ईथे नव्याने देत आहे. मेघाची गोष्टं आता मी मोठा झालो आहे! खूप मोठा!....इंग्लिश देवाची पुस्तकं वाचण्याएवढा मोठा!....गच्चीवर एकटा झोपण्याएवढा मोठा!....माझ्याच पैशातून रंगीत कागद विकत घेण्याएवढा मोठा!....एकट्याने चार ग्लास रसना पिण्याएवढा मोठा!....बर्फ खाल्ल्यावरही ताप न येण्याएवढा मोठा!.....विमानाने अमेरिकेला जाण्याएवढा मोठा!.....मी आता एक ग्रेट आणि शहाणा माणूस झालो आहे हे नक्की. माझ्या वर्गातली मिनी चिरमुले आज दुपारी 'तू मला आवडतोस' असे सांगत होती. मिनी अजून लहान आहे. मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी तिला कळतातंच असे नाही.

समाज आणि काम

लेखक लेखनवाला यांनी गुरुवार, 28/05/2020 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही म्हातारी इथं अशी रस्त्यावर का? अशी दीनवाणी…. अंगावरचं लुगडं ते तसचं, दोन दिवस झाले….. अंगाला पाणी नव्हतं….

दोसतार - ४७

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 22/05/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक एक गार वार्‍याची झुळूक आली. डोक्यावर लिंबाचे पान पडले म्हणून वर पाहिले. काळेभोर आकाश पूर्ण चांदण्याने भरले होते. आकाशात दिवाळी होत असावी इतके. तिथे वीस ठिपके वीस ओळी पेक्षाही मोठ्टी रांगोळी काढलेली होती. मी तानुमामाला ती रांगोळी दाखवली. तानुमामा म्हणाला आपल्या रांगोळीला उत्तर म्हणून आज्जी तेथे रांगोळी काढतेय . खरंच असेल ते. नाहीतरी इतकी सुंदर रांगोळी आज्जीशिवाय दुसरे कोण काढणार होते.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46822 अंगणात दिवाळीचा किल्ला बनलाच नाही. अंगणात फटाके ही वाजवावेसे वाटले नाही. नुसता कचरा.

[शतशब्दकथा] Everything is fair in business and politics

लेखक SaurabhD यांनी गुरुवार, 21/05/2020 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा खरंच पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ... ------------------ प्रोजेक्ट डेमो नंतर काही काळाने ... "मानलं तुम्हाला डॉक्टर, खरंच जबरदस्त आहे तुमचं डिझाईन. तुमचा विशेष सन्मान केला जाईल ... गुप्तपणे ..." "थँक्यू सर ..." "तुमच्या औषधाने पण चोख काम केलं आहे." "थँक्यू सर ... पण आपण ते औषध इतर देशांना का नाही विकत ?

कडं २

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/05/2020 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
तपकिरी रंगाचं बांड कुत्रं ते. इवल्याशा झुडपाच्या सावलीत अंग चोरून बसले होते. दुपारचं लाही लाही करणारं ऊन. रानवटीचे खुरटे झोंबरे काटे. वारा सुटला तरी तापलेल्या झळया लाग्याव्यात. वाळलेली कुसळं आणि सुदूर पसरलेल्या येड्या बाभळी. चढउतार असलेला खडकाळ प्रदेश. पहावे तिकडे मृगजळेच दिसावी. लखोबाची वाडी अशी भरदुपारी शांत निवांत सुस्तावून जायची. भरगच्च जेवलेल्या ढेरपोट्या म्हाताऱ्यासारखी. बांड्या कुत्र्याचा डोळा लागणारंच होता की भरधाव वेगानं एक गाडी त्याच्या पुढून निघून गेली. कुत्रं थोडं भांबावलं. आणि आयतीच नामी संधी शोधत गाडीच्या मागे तुटून पडलं. जोरजोरात भुंकत गाडीच्या मागे धाव धाव धावलं. मग थकलं.

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ५ (अंतिम)

लेखक स्टार्क यांनी सोमवार, 18/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४ आमच्या निहालगंजचे ना हेच मोठे वाईट आहे. पाऊस पडला तर असा बेशुमार की तीन दिवस घरातून बाहेरच पडायला नको.

किलर

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 18/05/2020 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या पाच हत्येने बरीच खळबळ माजून गेली. दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात, एकामागून एक असे पाच खून म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीचे ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे, म्हणजे खुनी शहरातीलच असावा. आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेले असावी. कारण हत्यारा मानेच्या पाठीमागून सुरा फिरवून तो गळ्यापर्यंत आणायचा. म्हणजे गळा पूर्णपणे गोल भागात चिरलेला असायचा. त्यामुळे खून झालेल्या इसमाचे डोके केवळ कंठाच्या हाडावरच टेकलेले असायचे.

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४

लेखक स्टार्क यांनी रविवार, 17/05/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३ दादाजानना जाऊन आता हप्ता होत आला होता. त्यांचा जनाजा निघाला तेव्हा सारा मुहल्ला जनाज्याच्या मागून कब्रस्तानपर्यंत चालत गेला. त्या दुपारी पाहिला तसा आजिबात चहलपहल नसलेला सुनसान मुहल्ला मी कधीच पाहिला नव्हता.

हॅलो

लेखक मित्रहो यांनी रविवार, 17/05/2020 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
[या कथेला ग्रंथाली वाचक दिन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होता.] "अरे आईंचा फोन आला होता." आकाश घरी येताच आकृतीने निरोप दिला. तसे आकाश आणि आकृती एकाच कंपनीत कामाला होते पण मुलगा घरी एकटा असतो म्हणून आकृती नेहमी लवकर घरी येते. आकाशला उशीर होतो. "उशीर झाला आज" "ट्रॅफिक. एकदा चंद्रावर मनुष्यवस्ती होईल पण बंगलोरचे ट्रॅफिक सुधारणार नाही. आई काही बोलली का?" "नाही, सहजच. आल्यावर फोन कर. येवढच." "बाळूमामासाठी असेल." "कोण बाळूमामा?" "जाऊ दे ग. आई आणि तिचे नातेवाईक न संपणार प्रकरण आहे. तिकडे बुऱ्हानपुरला असतात. आजारी आहेत. वय झालेले आहे.