Skip to main content

कथा

काळ

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 03/04/2021 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
काळ वासंती तिशीची झाली तरी लग्नाचा विचार करायला तयार नव्हती. तिच्या आई-वडिलांना ती काहीशी उशिराच झाली होती. बाबा आणि आई देखील दोघेही रिटायर होऊन सिनियर सिटीझन्सचं आयुष्य जगायला लागल्याला आता तीन-चार वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण धडधाकट आहोत आणि थोडीफार जमापुंजी हाताशी आहे तोपर्यंत लेकीचं लग्न हौसेमौजेने करून टाकावं. वासंती अत्यंत हुशार मुलगी होती आणि दिसायला देखील छानच होती. लांब काळेभोर केसांची एक लांबसडक वेणी ती घालायची. मोठे बोलके डोळे होते तिचे. राहणी अगदी साधी होती. आजच्या काळातदेखील ती ऑफिसला जाताना व्यवस्थित साडी नेसून जात असे.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 31/03/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

नकार

लेखक सरिता बांदेकर यांनी गुरुवार, 25/03/2021 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
नकार लेखिका सौ सरिता बांदेकर “ए,शुक शुक,कुठे येतोयस?? चल जा इथून.” “अगं,संडासाच्या दरवाज्यात ऊभं राहून कुणाला हाकलते आहेस????” मला माझा नवरा विचारत होता.त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझं आपलं घरात घूसू पाहणऱ्याला हूसकावून लावायचं काम चालू होतं.कितीही वेळा हाकललं,घरात घेण्यास नकार दिला तरी काही चेंगट घरात शिरण्याचा प्रयत्न करायचेच.माझा नकार ऐकला की त्यांना जोरात हसू यायचं. “ काय यडपट आहे ही.

भयकथा १ : ऋण

लेखक साहना यांनी मंगळवार, 16/03/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या गोष्टींना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता एक नवीन मालिका सुरु करावीशी वाटली. गावाच्या गोष्टी संपल्या नसून आणखीन अनेक गोष्टी आहेत. यथावकाश प्रकाशित करेन. ह्या आधी भयकथा लिहिल्या नसल्याने हा नवीन प्रयोग करत आहे. नेहमीप्रमाणे चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. भयकथा लिहिणे कठीण गोष्ट आहे. विनोदी लिहिणे किंवा कारुण्यपूर्ण लिहिणे त्यामानाने सोपे, कारण एक चांगला विनोद सर्वानाच विनोदी वाटतो किंवा एखादी दुःखद कथा बहुतेकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. पण भयाचे तसे नाही. काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना अंधाराची. काहींना उंचीची भीती वाटते तर काही लोकांना विदूषकाची.

वर्चुअल वर्ल्ड

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 13/03/2021 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्चुअल वर्ल्ड अनिकेत आणि सुरभी दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले ते एका मल्टिनॅशनल कंपणीमधल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी. अनिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि सुरभीचा इंटरव्ह्यू HR डिपार्टमेंटमध्ये होता. इंटरव्ह्यूसाठी थांबले असताना झालेली ओळख दोघांना त्याच कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाढत गेली आणि दोघे कधी प्रेमात पडले ते कळलंच नाही. दोघे दोन वेगळ्या ठिकाणी राहात होते; पण वर्षभरात त्यांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि एकत्र राहायला लागले. सुरभी अत्यंत बडबडी होती. त्यामानाने अनिकेत शांत स्वभावाचा. सुरभिचे अकाउंट्स सगळ्या सोशल मीडियावर होते. तर अनिकेत गरज म्हणून फक्त whatsapp वापरत होता.

तो होता तरी कोण? (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 08/03/2021 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे.               तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही.

भूक

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 05/03/2021 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
 भूक  सुप्रियाची सुनंदा आत्या नाशिकमध्ये एकटीच राहात होती. सुनंदा आत्याने नुकताच एक लहासा तिच्यापुरता असा फ्लॅट घेतला होता एका नवीन होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि या वयात देखील अगदी हौसेने सजवला होता. सुप्रियला तिच्या सुनंदा आत्याचं खूप कौतुक वाटायचं. एकटी राहात होती तरी एकदम खुश असायची. या वयात देखील तिने whatsapp, facebook कसं वापरायचं ते शिकून घेतलं होतं आणि ती ते अगदी सफाईदारपणे वापरत देखील होती. सुप्रिया देखील तिच्या आत्याची अत्यंत लाडकी भाची होती. भावाला उशिरा का होईना पण गोंडस बाळ झालं याचा आत्याला खूप आनंद होता. त्यात सुप्रिया अत्यंत गोड आणि साधी सरळ मुलगी होती.

दगड

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्पकार आणी शिल्पकला प्राचीन भारतात कीती प्रगत होती याचे पुरावे जागोजागी अढळतात. माझा काही अनुभव शेअर करतो. जबलपुर भेडाघाट लाईमस्टोन, जयपुर मकराणा मार्बल स्टोन ताजमहाल आणी अलीकडची बिर्ला मंदिर , जैन मंदिरे मध्यप्रदेश खजुराहो मंदिरे , सँण्ड स्टोन, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू कृष्णशिळा ब्लँकस्टोन, तिरुपती बालाजी ग्रानाईट आसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांमधून आपल्या पूर्वजांनी अद्भुत शिल्प निर्माण केली आहेत. पुण्यात बदली झाल्यावर विचार केला दक्षिण भारतात प्रवासाला जाऊया. मदुराई, कोडाईकँनाल, रामेश्वरम- कन्याकुमारी आणी त्रिवेंद्रम आसा दहा दिवसाचा प्रोग्राम.

प्रवास (भाग 9) (खरा शेवट....)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 27/02/2021 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 9 (खरा शेवट) पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली. भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत." पवारने गाडी वळवली आणि निघून गेला. वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......" जाता जाता पवारने भिकू जे बोलला ते ऐकलं होतं. 'येड लागलं बहुतेक या राक्षसाला....' पवारच्या मनात आलं. *** भिकू शांतपणे चालत होता वाड्याच्या दिशेने. पण त्याचे कान दूर जाणाऱ्या गाडीचा मागोवा घेत होते. गाडी नक्की निघून गेली याची भिकुला खात्री झाली.

लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन १)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 26/02/2021 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन) लेखक –पाउलो कोएलो अनुवाद –चंद्रकांत सहस्रबुद्धे अल्केमिस्ट वाचल्यानंतर पाउलो यांच दुसरेच पुस्तक हाती पडले.वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले पाउलो यांची ही २०१०-२०१२ या कालखंडात लिहिलेली दायारीच आहे.नुकतेच त्यांनी लिखाणासाठी संगणक वापरायला सुरुवात केली आहे,अमेरिकेतील ट्रेड सेंटरच अपघात वगैरे समकालीन घटना यात लिहिल्या आहेत.थोड वाचून झाल्यावर स्वत:ला प्रश्न विचारला ..खरच हे बौद्धिक,वैचारिक वाचायची आता गरज आहे का?पण थोडे अजून वाचुया हे ठरवलं. आणि खरोखरच प्रेम,मन:शांती,युद्ध विशेष म्हणजे मृत्यु याबद्दल एव्हढ सुंदर सोप्या भाषेत पा