थोडे अद्भुत थोडे गूढ - ४
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ.
१८४० मध्ये युरोपात आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आयरीश लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे बटाटा! या बटाट्याच्या पीकावर पडलेला भयंकर रोग या दुष्काळाला मुख्यतः कारणीभूत होता. या काळात आयर्लंडमधील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बटाट्याच्या शेतीवर अवलंबून असलेली सुमारे ४० ते ५०% आयरीश जनता देशोधडीला लागली! या दुष्काळातून वाचण्यासाठी अखेरचा उपाय म्हणजे दुसर्या देशांत स्थलांतर करणं!
मिसळपाव