Skip to main content

कथा

गव्हाची पोती

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/09/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक वकील मित्र आहे त्याने सांगितलेला एक किस्सा एक न्यायाधीश महाराज असतात,,खादाड असतात पण फार चतुर.. त्यांचा एक विश्वासू किराणा दुकानदार होता मारवाडी समाजांतला. काम व्हावे म्हणून जी रक्कम ठरायची ति मारवाड्या कडे पोहोचती झाली की काम व्हायचे.. न्यायाधीश महाराज पण किराणा ध्यायच्या निमित्ताने दुकानात गेले की सांकेतिक भाषेत गप्पा चालायच्या.. नवीनं गहू आला की नाही दुकानात??? हो आला आहे ना ..

देव पूजा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/09/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक सधन श्रद्धाळू ब्राह्मण राहतं होता.. त्याला मुलगा व सून असते पण मुलगा आळशी अन वाया गेलेला असतो.. वडील म्हातारे झाल्याने देवपूजा कर असे ते त्याला कानी कपाळी ओरडून सांगत असायचे पण हा आळशी असल्याने त्याला त्याचा कंटाळा यायचा व तो वडिलांचे ऐकत नसे. एके दिवशी वडीलांना कामानिमित्त आठवडा भर बाहेर गावी जायचे असल्याने निदान हा आठवडा तरी तू देव पुजा कर असे वडील बजावतात व कामासाठी बाहेर जातात.. मुलगा वैतागतो अन पुजा टाळण्यासाठी सासुरवाडीला जातो. चहा पाणी होते व तो विचारतो की सासरे बुवा दिसत नाहीत? यावर सासूबाई म्हणतात काम असल्याने ते सकाळीच बाहेर गावी गेले आहेत २-३ दिवसात परत येतीलच.. व म्हणत

थोडे अद्धुत थोडे गूढ - ५

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 06/09/2014 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेच्या ईशान्येला गल्फ ऑफ मेक्सीकोच्या पलीकडे पसरलेला सागर म्हणजे कॅरेबियन समुद्र. मेक्सीकोच्या उत्तरेकडील किनारा आणि क्युबापासून वेस्ट इंडीज बेटांमधील त्रिनिदादपर्यंत हा पसरलेल्या या सागराच्या किनार्‍यावर अनेक लहानमोठे देश आणि असंख्य बेटं आहेत. पॅसिफीक आणि अटलांटीक महासागरांना जोडणार्‍या पनामा कालव्यातून जहाजं प्रवेश करतात ती याच कॅरेबियन समुद्रात. कॅरेबियन समुद्र ओलांडल्यावर बेटांच्या दरम्यान असलेल्या अनेक मार्गांतून उत्तर अटलांटीक महासागरात प्रवेश करता येतो.

ब्रह्मांड

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 05/09/2014 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं. आणि मग तू मला भेटलास. "काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस. "तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता? "माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..." "हो" मी म्हणालो. "मी ..

बेबी 3

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 04/09/2014 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवडी बेबीच्या मनावरील बराच ताण हालका झाला होता, ती नेहमी प्रमाणे कामावर जात होती.

प्रमोशन

लेखक vikramaditya यांनी बुधवार, 03/09/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता. समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!" त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच.

भविष्य (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 03/09/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच ! पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.'' ''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . '' ''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते! म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.'' ''नको. . . हिंदीत नको. '' ''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?'' ''छेछे , भलतंच काय?'' ''ठीकाय तुमची इच्छा!

काळसारं (लघूकथा)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 02/09/2014 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
तिने आपले हात धुतले न्हाणीमध्ये, चुलीवर आमटी गरम करायला ठेऊन, बाजूला ठेवलेली भाकरी ताटात घेतली, जरा वेळाने गरम आमटी वाटीत ओतली आणि भाकरीचा एक तुकडा मोडून त्यात बुडवला. बाजूची चिमणी रॉकेल संपल्यामुळे मंद मंद होत वीजू लागली होती, एकदाची ती विजली, तिने खस करून चुलीतले जळते लाकूड बाहेर काढले, झोपडी अगदी लाल रंगात उजळुन गेली.. तिने आपले हात ताटात धुतले व धडपडत बाहेर आली. बाहेर गच्च अंधार पसरला होता, दूरवर कोठेतरी एखादा फड जळत होता! तिने आपले त्याच्याकडे पाहिले न पाहिले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली.. "शेण पडो, त्याच्या तोंडात!" आपली वळकट सरळ करून ती झोपी गेली. "अंग, रुक्मीअक्का..

"पुरोहिताचे भूत"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 02/09/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो.. स्वभाव भित्रा व कशाची तरी सारखी काळजी करणे असा त्याचा स्वभाव असतो...गरीब असल्याने लग्न हि लांबले होते.. शेवटी ग्रहमान उच्चीचे येते व वयाच्या ४०-४२ वर्षी लग्न होते...३ मुले होतात.. आधीच गरिबी त्यात पोरवाडा या मुळे प्रापंचिक ओढाताणीने तो जेरीस आला असतो..व त्यांतून आपले पुढे कसे होणार या काळजीने तो खंगू लागतो.. त्यातच तो आजारी पडतो..अन बिछान्यावर पडल्या पडल्या व अश्या आजारात जर माझा मृत्यू झाला तर बायका पोरांचे काय होणार या विचाराने त्याच्या काळजात धडकी भरते..आजारातून बरा होतो पण काळजी काही पाठ सोडत नाही. त्याचा त्याच गावत एक जिवलग मित्र रहात असतो...तो मित्र

नित्य नियम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 29/08/2014 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक शेतकरी राहतं होता. त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे.... त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो... त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो. त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,, त्याने काय होते? मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले. शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी श