Skip to main content

कथा

शशक का चषक

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 03/06/2022 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक बिचारा....... "तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात, काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला", इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत. हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला. आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा. शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे. पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी. आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला.

परिक्रमा

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 01/06/2022 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते... संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..

चिरकुट मुलगी—3

लेखक भागो यांनी मंगळवार, 31/05/2022 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
चिरकुट मुलगी—3 (चिरकुट मुलगी—२ इथे आहे https://www.misalpav.com/node/50277) (चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273) अष्टावक्र जादूगार सकाळ झाली. अंकलकाकांनी जोजोच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवून त्याला जागे केले. “उठ.” जोजो जागा झाला. त्याने आपलं आवरलं आणि कपडे करायला सुरुवात केली. त्याने निळे मोजे चढवले. सोनेरी कॉलरवाला निळा शर्ट, निळी पॅंट, सोनेरी बक्कलवाला निळा पट्टा, निळे बूट असा त्याचा पोषाख होता.

माझी राधा - ९ ( अंतीम )

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 31/05/2022 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
बाहेरच्या अंधाराला सकाळच्या धुक्याची जोड आहे. वातावरण अधीकच गहिरे झालंय. अशा वेळेस आपल्या एकटेपणाची जाणीव जास्तच होते. पैंजणाच्या घुंघरांचा आवाज येतो. मी चमकून समोर पहातो. समोरच्या धुक्यातून एक आकृती जवळ येताना दिसते. मी सावध होतो. हात मंचकाशेजारी ठेवलेल्या खड्गाकडे जातो. पण तो तेथपर्यंत पोहोचत नाही. मधेच थांबतो. धुक्यातून येणारी आकृती म्हणजे तू आहेस. हे जाणवताच मी थबकतो मागील दुवा : माझी राधा -८ http://misalpav.com/node/50263 राधा ? आत्ता..... या इथे..... की मग आणखी कोण ? राजाला त्याच्या अंगी जात्याच सावधपणा ठेवावा लागतो.

चिरकुट मुलगी--२

लेखक भागो यांनी मंगळवार, 24/05/2022 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
चिरकुट मुलगी--२ (चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273) “अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.” “लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.” जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला. “नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले. “जाम सुद्धा नाही?

चिरकुट मुलगी--१

लेखक भागो यांनी सोमवार, 23/05/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
चिरकुट मुलगी--१ राजकुमारी वेणू ह्यांच्या कृपेने श्री भानगौडा गोपालगौडा पाटील (माननीय सदस्य “भारत इतिहास संशोधन मंडळ” पुणे) ह्यांची विविचे(विचित्र विश्व) “दरबारी इतिहासकार” म्हणून नेमणूक झाली. विचित्र विश्वची समग्र बखर लिहायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राजकुमारीच्या आदेशानुसार श्री भागो ह्यांनी विविच्या चित्र विचित्र लोकांबद्दल, तिथल्या जादूगिरीबद्दल सहा खंडात अनेक कथा (खर तर जसे घडले तसे) लिहिल्या. पुण्याच्या काही छिद्रान्वेशी इतिहासतज्ञांनी त्या परीकथा आहेत अशी भलावणी करून त्यांना उडवून लावल्या.

माझी राधा - ८

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 23/05/2022 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
कसली तरी बाधा झाली आहे म्हणे तीला, गोवर्धन पर्वताच्या वाटेवर एक आश्रम आहे. तिथले आचार्य यावर उतारा देतात तिकडे न्यायचे आहे एकदा तीला." लोक असे काहीबाही बोलत होते. पण ते तुझ्या कानावरच येत नव्हते. आणि मग तो दिवस आला. मागील दुवा माझी राधा http://misalpav.com/node/50243 एक दिवस ,मथुरेहून दूत एक निरोप घेऊन आला. मथुरेत युवक दिनाचा उत्सव होता. त्यासाठी येण्याचे आमंत्रण होते. त्यात मल्ल युद्धाचे सामने देखील होते. युवादिनाचे म्हणून खास मला आणि बलरामदादाला उत्सवाचे निमंत्रण होते.

मी आणि माझे आजोबा

लेखक भागो यांनी शनिवार, 21/05/2022 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझे आजोबा. ह्या जगात आजोबाच माझे सर्व काही होते. माझे बाबा, माझी आई, माझा भाऊ बहीण, माझे मित्र, माझी शाळा, माझी चित्रांच्या गोष्टीची पुस्तके. सर्व काही माझे आजोबा! आजोबांची परिस्थिती माझ्यासारखीच होती. मला आजोबांशिवाय कोणी नव्हते. आजोबांना माझ्याशिवाय कोणी नव्हते. जगता जगता केव्हातरी मला समजले की लहान मुलांना आई बाबा असतात. मी आजोबांना आई बाबांच्या बद्दल कधी विचारलं नाही आणि आजोबांनी स्वतःहून कधी सांगितले नाही तोपर्यंत माझी समजूत होती की मुलांना आजोबा असतात आणि आजोबांना मुलं असतात. माझं हे असच होतं.

माझी राधा - ७

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/05/2022 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
त्या क्षणी तुझ्या चेहेर्यावर खूप काही बदल घडत जातात. आभाळ भरून यावे तसे तुझे ते टप्पोरे डोळे भरून येतात. तुझ्या तोंडून हुंदका फुटत नाही इतकेच. तू कसबसे स्वतःला सावरलंस. आणि तुझ्या हातातले मोरपीस माझ्या हातावर फिरवत म्हणालीस ' मी ते मोरपीस आहे असे समज." तुझ्या शब्दांचे अर्थ समजण्याचे वय नव्हते ते माझे. पण ते कुठेतरी आत खोलवर भिडले. मी नि:शब्द झालो मागील दुवा http://misalpav.com/node/50189 माझ्या हाताला घट्ट धरून जवळजवळ ओढतच तू मला नंदवाड्यात घेऊन गेलीस. माय अंगणात माझी वाटच पहात बसली होती. मला पहाताच ती पुढे आली.

पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 15/05/2022 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही वाट एकटीची ही वपु काळे यांची अगदी पहिलीच कादंबरी. या कादंबरीची नायिका आहे विद्युलता उर्फ बाबी. बाबी एक स्वातंत्र्य विचारांची तेजस्वी, निर्भीड व करारी मुलगी आहे. ती तत्वनिष्ठ आहे, हट्टी आहे. ती कुणालाही न घाबरता स्वतःचे विचार परखडपणे मांडते.