कथा
सुटलेल्या पोटाची कहाणी -४
भाग-१
भाग-२
भाग-३
__________________________________________________________________________________
जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.
सुटलेल्या पोटाची कहाणी -३
भाग-१
भाग-२
__________________________________________________________________________________
निश्चय केला, मनातल्या मनात भीष्म की कायशीशी प्रतिज्ञा केली, 'पोट आत घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते आत घेणारच'.
प्रतिज्ञा केल्यावर जाणवले बहुतेक हा हक्क नसून कर्तव्य असावे, पण मग शाळेत नागरिकशास्त्राच्या तासाला, 'हा मुलगा वर्गाचा नागरिक नसलेला बरा' असेच सर्व शिक्षकांचे मत असल्याने मी कायम outstanding विद्यार्थी राहिलो होतो, त्यामुळे अश्या चुका होणारंच अशी स्वतःची समजूत काढून घेतली.
कोपरयातलं रोपट.
आमच्या कॉलेजला नुकत्याच सुट्टया लागलेल्या होत्या. सगळं चंबुगबाळ घेऊन गावी निघालो होतो. पेपर संपल्यानंतरची खुशी काय वर्णवावी! रिझल्ट लागेपर्यंत का होईना ती टिकून राहते.
बसस्थानकात अत्यंत स्वच्छ, मोकळी बस मझ्यासाठी उभी होती. 'प्रवासी हेच आमचे दैवत' हे सिद्ध करणारा तेजस्वी,हसरया चेह्रयाचा कंडक्टरही लाभला होता.कंदमुळे खाऊन या कंडक्टरने कोणालाही कंप सुटावा अशी तब्येत मिळवली असेल असे वाटले. अदबीने तिकीट फाडुन माझ्याकडे दिले गेले .नेहमीप्रमाणे अखिल भारतीयांना सतावणारा सुट्टया पैशांचा प्रश्न त्यालाही भेडसावत होता हे कळाले.
वाहतं वारं
[ या आधीचा भाग: www.misalpav.com/node/33741 . तशी ती ही एक स्वतंत्र कथा होती आणि ही पण स्वतंत्र आहे. ]
________________________________________________________________________
टिपूर टिपूर चांदणं वढ्यामधी पडलयं. गढाळल्यालं पाणी खळबळ करुन वाहतयं. केक्ताडात बसून सुभान्या वगळीकडं बघतोय.सुताराचं म्हातारं वाट तुडवतं उतरणीला लागतं. पिशवी घीऊन जवा सुभान्यापशी येतं तवा हातातलं पुडकं त्येच्या हवाली करतं. भर अंधारात चिलीम जळत राहते. सुभान्या अंधारच पिऊन टाकतो. नशेत ऊठून चालत चालत सुभान्या भैरुबाच्या टेकाडावर येतो.
म्हण
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साहेबांचा पुढचा पुर्ण आठवडा धावपळीतच गेलेला. कसली कसली उदघाटनं, सत्कार समारंभ, मिरवणुका. नुसती पळापळ. आता आख्ख पोलिस खातं त्यांच्या हातात आलेलं म्हटल्यावर या गोष्टी कायम असनारच. पण पुढच्या पाच वर्षाची गणितं मांडुन त्यांना ते खातं त्यांच्याच पध्दतीनं चालवायचं होतं. मागच्या मंत्री साहेबांनी पाडलेले वळणं बुजवुन त्यांना ती नव्यानं टाकायची होती. त्यासाठी संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजीत केलेली. राज्यातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार साहेबांच्या बंगल्यावर जमा झाले.
सुटलेल्या पोटाची कहाणी -२
भाग-१
क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली.
माझा आवडता प्राणी
माझा आवडता प्राणी
फोर्थ च्या टिचरानी मुलींचे एसएज् वाचायला घेतले.विषय होता.माझा आवडता प्राणी .कुणी मांजरावर लिहिलं होतं,
एक दोघीनि घोड्यावरहि लिहीलं होतं ,पण बहुतेकिंचा आवडता प्राणी अर्थातच होता कुत्रा.चौथीच्या मुली भाषा
विषयाच्या या प्रकारात मोठ्यांची मदत घेतात,हे त्याना नवीन नव्हतं. मात्र मनोगत स्वत: विद्यार्थीनीचं असावं असा त्यांचा आग्रह असे.अनयाचा निबंध तिनं तिच्या शेजारच्या दीदी च्या साहाय्यानं लिहिला होता.तो कुत्र्यावरच होता.तो त्याना
खूपच भावला होता.तिनं लिहिलं होतं------------
माझा आवडता प्राणी----
"माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. आमच्या घरी आम्ही एक कुत्रा पाळला आहे.
बॉन्ड जेम्स बॉन्ड -'स्पेक्टर'
बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल.
नाखऱ्या
नाखऱ्या आमच्यासाठी हिरो होता. होताच तो देखणा . गोरा, उंच, धारदार नाक, डोळे , कुरळे केस.. आणि आम्ही एकजात बावळट. आधी आपल्या थोबड्याबद्दल काय वाटायचं नाही पण सातवी आठवीपासून ते खूपच टोचायला लागलं . आपले केस भलतेच बारीक आहेत, तेल लावलं की एकदम चम्या दिसतो असे अनेक शोध लागू लागले. आणि या सर्व शोधांचा मापदंड होता नाखऱ्या.
नाखऱ्या आमच्या जवळच राहत असे . त्याचे वडील बँकेत होते आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका. सुशिक्षित कुटुंब. आमच्या घरी सकाळच्या वेळी भाजीवाल्या येत असत. त्या आधी घरोघर जाऊन भाज्या विकीत आणि नंतर बाजारात विकायला बसत. पण त्या नाखऱ्याच्या घरासमोरून कधी जात नसत.
मिसळपाव