भाग ३ - https://misalpav.com/node/51961
कर्नल ऑडमिंटन.
एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने! कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता.
आता कान इकडे करा. हे नुसते नामधारी कर्नल होते. मॅलार्ड बदकं मारताना घेतलेला बंदुकीच्या पावडरचा वास आणि चार्ल्सटन शहरात रस्त्यावरून शांतपणे मिरवणुकीने जाताना पाहिलेली सैनिकांची रेजिमेंट हेच काय ते त्यांचे युद्धविषयक अनुभव!