कृष्णमुर्ती
(...मारीला म्यां डोळा ;)
पेरणा http://misalpav.com/node/47605
अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली
म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...
...मारीला म्यां डोळा 😉
पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्या जीवकाव्यरस
(सहजच..)
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..
सहजच चूक ती मान्य करोनी, तू निमूट माझ्यासमोर यावे,
तुला पाहुनी छद्मीहसूनी मी मग उदारातेने माफ करावे.
सहजच मग तू लाचार हसूनी, स्पर्ष मला जरा करु पहावा,
शहारुन मी झुरळा सारखा झटकून त्याला दूर करावा.
सहजच तुझिया नयनी तेव्हा अंगार क्षणभर फुलूनी यावा,
संधी साधुनी तेवढीच मग शब्दांचा तूज मार बसावा .
सहजच म्हणूनी बाजाराला, आपण दोघांनी पोचावे,
रिक्तहस्ते कैसी परतू मी?
(मन भूत भूत ओरडते..)
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...
आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन
(मन भूत भूत ओरडते..)
तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी का बाहेरची बाधा होते? मळभ दाटते तेव्हा मन भूत भूत ओरडते.. सहावे इंद्रिय जेव्हा शंकांची उडवीते राळ, आवेग जरा वा-याचा भासतो जणू वेताळ.. मिटताच डोळे माझे उभा मज समोर ठाकतो, रोज मला उठवाया तो झोटिंग बनुनी येतो.. लोक म्हणती आहे वेडा दिवस असो वा रात्र, किंचाळत असतो सारखा ताणूनी सर्व ही गात्रं.. (ही भुताटकी(सकाळी सकाळी)
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
किती पेग गेले
घशातून भरारा
म्हणे आठवांचा
सुटण्या येरझारा
घरचे निष्ठुर
म्हणती पितो देशी
विदेशी न मिळता
सकाळी सकाळी
रिकामी बाटली
अन पुडी फरसाणाची
जणू साक्ष देती
नादान पणाची
दिसे उभे घेउन
कुणी हाती जोडे
का भास व्हावा
सकाळी सकाळी
क्षणात डोळे
खाडकन उघडावे
कुणी तरी खाडकन
थोबाडी हाणावे
पैजारबुवा,
काव्यरस
(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)
पेरणा अर्थातच
(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )
मुलगी घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.
फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा
आठवड्याची भाजी, मसाले, लोणची..
बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..
काव्यरस
(कितनी राते....)
पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163
कितनी राते....
१. तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात.. मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही! पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला? म्हणे "आरामात बसू"! २. म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही? अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा. (सत्य घटनेवर आधारीत.....(डबा)
पेरणा अर्थातच
(डबा)
आज पहाटे तो लवकर उठला डबा उचलून धावत सूटला लायनीताल्या लोकांना ढकलून दिले दार जोराने बडवले आताल्याला लवकर बाहेर बोलावले जराही वेळ नाही असे सांगितले आतले प्रकरण कुल वाटले हालचालीच्या आवाजावरून मंद भासले मनोमन स्वप्न रचले वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे "अरे बाबा सावकाश आवर , होल वावर इज आवर" आजची कथा अशी झाली ज्याची बीजे त्याने कालच पेरली काल त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे(प्रच्छन्न)
प्रेरणा अर्थात
ती विडंबित कविता
धूसर होऊन
विरून जाते
कधी उचकापाचक
करता करता
अवचित दिसते
पुन्हा विडंबन ते
प्रतिक्रियांच्या
पल्याड नेते
अन् नकळत हसू
अवखळसे
ओठांवर येते
चिवट कवी हे
घाव विडंबित
सोशीत राहतो
अन् पुन्हा नवा
कच्चा माल पाहूनी
मी प्रच्छन्न हसतो
पैजारबुवा,
(पप्पूबाळा)
पेरणा अर्थातच
स्वतःची अक्कल इवलीशी
दुसऱ्याकडे ही असे थोडीशी
हे मान्यच नाही तयासी
काय म्हणावे या वृत्तीसी
पप्पूबाळा
मम्मा मॅडम मुग गिळीती
बडवून कापाळास घेती
पाहूनी तव मंदमती
जी तुझ्या खानदानाची महती
पप्पूबाळा
कैसी खांग्रेसची प्रगती
कैसा खांग्रेसचा नाश
केवळ असे दैवदूर्विलास
त्याचे दु:ख असे कोणास?
पप्पूबाळा
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
जनतेस करुनी त्रस्त
ज्ञान स्वतःचे पाजळतोस
का विदुषकासम वागतोस?
मिसळपाव