मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

सर्कसः पुन्हा अनुभवलेली

देवदत्त ·
आमच्या घराच्या मागे खरे तर खाडी होती. ती बुजवून त्यावर बांधकाम कधीतरी सुरू होणार हे नक्कीच. ती खाडी कधी बुजविली ते कळले नाही. पण आता तर त्या जागेवर सर्कससुद्धा उभी राहिली. गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे १६ ऑक्टो. पासून ती सुरू आहे. नेहमी प्राण्यांचा आवाज ऐकू येत असे. दररोज दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे संगीत सुरू होते. ते रात्री ९:३० ते ९:४० पर्यंत सुरू असते. मी बहुधा १६ वर्षांपूर्वी सर्कसला गेलो होतो. तेव्हा असे गाणी वगैरे असल्याचे मला आठवत नाही म्हणून वाटले, सर्कसवाल्यांनी मध्येच ऑर्केस्ट्रा ही सुरू केला की काय? :( लहानपणी तर आम्ही वडिलांसोबत जात असू.

...आणि गावसकर पेटला!

फारएन्ड ·
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्‍याच गोष्टी आठवल्या. १९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता.

डेव्हीड शेफर्ड बाद.... :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
डेव्हीड शेफर्ड क्रिकेटमधील दरारा असणारा आणि एक लोकप्रिय पंच. क्रिकेट अकरा खेळाडूंचे असते पण पंचाचे पारडे इकडे
devid 9
तिकडे झुकले की क्रिकेटचे विजय,पराभवाचे समीकरण बदलून जाते.

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य

जे.पी.मॉर्गन ·
मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या 'टियर २' सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं ! अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू?

अलीकडचे "चिडके बिब्बे" ऑस्ट्रेलियन खेळाडू

पारंबीचा भापू ·
हे माझे पहिले-वहिले लेखन आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे! ================================================ क्रिकेटची गोडी मला लागली १९६० पासून. त्यावेळी इंग्लंडचे कप्तान होते लेन हटन व नंतर पीटर मे, ऑस्ट्रेलियाचे होते हॅसेट् व रिची बेनो, पाकिस्तानचा करदार, वेस्ट इंडीजचे वॉरेल वगैरे. भारताचे कप्तान सारखे बदलायचे, कधी पॉली उम्रीगर, कधी बुधी रामचंद कधी अमरनाथ वगैरे. आपण क्वचितच जिंकत असू, त्यामुळे भारताच्या विजयाची अशी मनात जिद्द वाटायची नाहीं, पण ऍशेस् सीरीजकडे मात्र खूप लक्ष असायचं. इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं म्हणून असेल, पण ऍशेस् सीरीजबाबत ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकावी असे मनोमनी वाटायचे.

जादुगार!

ऋषिकेश ·
सन १९२८! अ‍ॅम्स्टरडॅम ऑलिंपिक मधे हॉकीचे सामने चालु झाले होते.... ऑलिंपिकमधे हॉकी नुकतेच समाविष्ट झालेले... लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला.... भारताचा पहिला सामना ऑस्ट्रीयाबरोबर.... पहिला सामना भारताने थेट ६-० असा जिंकला.... त्यानंतर भारताने अखंड झंजावात चालु ठेवला.... दुसर्‍याच दिवशी बेल्जियमला ९-० ने हरविले.... दोनच दिवसआंनी डेन्मार्कला ५-० ने मात दिली आणि सेमी फायनलला पोहोचला. सेमी-फायनलला स्विस खेळाडूंना ६-० असा चोप देऊन भारतीय फायनलला पोचले. घरच्या पटांगणावर खेळणार्‍या नेदरलँडला भारताने ३-० ने हरवले व आपले पहिले सुवर्णपदक जिंकले.

आमचे जाधव सर

जे.पी.मॉर्गन ·
"सर बॉल प्लीज"....... मी त्यांना म्हटलं. सहा फूट उंच, भरभक्कम शरीर, नेव्ही ब्ल्यू रंगाचा ट्रॅक-सूट घातलेल्या त्या चाळिशीच्या व्यक्तीला आधी कधी शाळेत बघितलं नव्हतं. दोन धारदार घारे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. "सर..... बॉल प्लीज" "इकडे ये". त्यांचं त्या टेनिस चेंडूकडे लक्ष सुद्धा नव्हतं. मी जवळ गेल्यावर त्यांनी मला विचारलं "काय रे हिरो..... व्हॉलिबॉल खेळणार का"? हा प्रश्न अनपेक्षित होता. "व्हॉलिबॉल"? मी विचारलं. तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले. म्हणाले. "हे जाधव सर आहेत. तुम्हाला व्हॉलिबॉल शिकवणार आहेत. आपल्या शाळेची टीम तयार करायची आहे.

क्रिकेट आणि मी......

dineshpalkar ·
O:) mala mazya school madhe Aalela Anubhav mala lahanpanapasun cricket khelaila aavadto. me school madhun ghari aalyavar daptar bajula takun saral groundvar pohchat aasaycho. aani sarva mule khelnyasathi tayar aasaychi. mala cricketmadhe khup Aavad hoti. pan khelun aalyavar me sarva gruhapat karat ase. mala cricketch aalela anubhav aani shikshya yabhddal sangat aahe. me 9 vit hoto.