Skip to main content

क्रीडा

'सायलेन्स प्लीज'

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 10/09/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
'सायलेन्स प्लीज' हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली... टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप १५-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक ३०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप ४०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक टक टक टक टक टक ६०-० परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली...

मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 10/09/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग! मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे! न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल.

सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून.....

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 25/08/2010 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा'वरील सहसभासदांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा. त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच. http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_cho… धन्यवाद, सचिनचा 'आद्य चमचा', सुधीर काळे

"तेजस्विनी" चे थाटाचे स्वागत

लेखक इन्द्र्राज पवार यांनी बुधवार, 11/08/2010 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ कोल्हापुरालाच नव्हे तर सार्‍या महाराष्ट्राला, देशाला अत्यंत अभिमान वाटावा अशी "नेमा"ची सुवर्ण कामगिरी करून घरी परतलेल्या तेजस्विनी सावंतचा करवीरकरांनी अगदी हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत-सत्कार केला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हजारोंनी जणू काही आपली कन्याच, आपली लाडकी बहिणच पराक्रम गाजवून माहेरी आली आहे अशा भावनेने तिच्यावर खाली फोटोत दाखविल्याप्रमाणे कौतुकाचा वर्षाव केला.

पंछी बनू उडता फिरू...

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 03/08/2010 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
गरमागरम धिरडी हाणली तोवर १०:४५ झाले होते. ११ ला निघायचे म्हणजे सगळ्यांना १०:४५ पासून हल्या करायला सुरू केले (पीएम ची खोड.... )शेवटी ११:०५ मिनिटांनी ७ जवानांनी साओ कॉन्राडो बीच कडे कुच केली.. तिथे पॅराग्लायडींचे कार्यालय कुठे आहे ही माहिती एप्रिल मध्ये किंमत विचारून हिंमत न झाल्याने आधीच झाली होती. तरी एकदा गुगलबाबाला शरण गेलो पेद्रो बोनीतो रँप इथे माहिती वाचली. बिगफ्लाय ह्या कंपनीची साईट बघून घेतली..

बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 14/07/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली. मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...

लेखक बद्दु यांनी बुधवार, 14/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...आहे का कोणाकडे? क्रुपया लिन्क द्या..आम्च्या मन्डळाच्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी हवे आहेत.. धन्यवाद.

द गेम ऑफ द सेंचुरी!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 11/07/2010 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
१७ ऑक्टोबर १९५६. न्यूयॉर्कमधे रोझेनवॉल्ड चेस टूर्नामेंट सुरु होती. १३ वर्षाचा एक बालक त्याच्या दुप्पट वयाच्या इंटरनॅशनल मास्टर आणि अमेरिकन चेस चँपिअन असलेल्या डोनाल्ड बायरनसमोर बसला होता. लोक कुतुहलानं हा सामना बघायला जमले होते. त्यातही हा मुलगा काळी मोहोरी घेऊन खेळत होता त्यामुळे किती चालीत तो मात खातो आहे ह्याचेच आडाखे बहुदा बांधत असावेत पण त्यांना कल्पना नव्हती की त्यादिवशी ते एक इतिहास घडताना बघणार होते!

अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/07/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला! विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्‍याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते.