लेखकचतुरंगयांनी शुक्रवार, 21/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव.
दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी.
सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो?
आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती?
लेखकचतुरंगयांनी गुरुवार, 20/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आठव्या डावात आनंदने निर्णायक विजय खेचून आणणे आवश्यक असताना नीरस बरोबरी झाली.
मधल्या एका विश्रांतीनंतर आज नवव्या डावात आनंद 'डू ऑर डाय' परिस्थितीत आहे.
काळी अथवा पांढरी मोहोरी न बघता त्याने विजयासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा सामना पुरे १२ डाव देखील होणार नाही अशी (चेन्नै साधार) भीती वाटते! :(
काळ्या मोहोर्यांकडून खेळताना आनंदने कायम बरोबरीचे ध्येय ठेवल्यासारखे आतापर्यंतच्या डावांत वाटत आले आहे.
आज आनंद पुन्हा एकदा जोमदार प्रयत्न करेल अशी आशा ठेवूयात आणि डावाकडे वळूयात.
अजून १५ मिनिटे आहेत. तोवर कोणीतरी पट लावा रे!! :)
लेखकचतुरंगयांनी मंगळवार, 18/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्या क्रमांकाचा!
शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला.
शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;)
चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत.
लेखकचतुरंगयांनी सोमवार, 17/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या डावातल्या सिसिलिअन नंतर आनंदने पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स निवडलाय! हा मॅग्नुसचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे आनंदने कोणते विरिएअशन सुट्टीच्या दिवसात तयार केले आहे हे बघायची उत्सुकता आहे. आनंद वेगाने खेळतोय त्यामुळे तयार होऊन आलाय हे नक्की. आज त्याला किमान बरोबरी करावीच लागेल अन्यथा सामन्याचे पारडे बरेचसे मॅग्नुसच्या बाजून झुकेल हे नक्की.
चला डाव बघूयात.
लेखकचतुरंगयांनी शुक्रवार, 14/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल.
आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे.
एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत.
शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो.
लेखकचतुरंगयांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते?
आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्या मोहोर्यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही?
डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !
लेखकचतुरंगयांनी मंगळवार, 11/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!!
आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद?
कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा.
आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय.
लेखकमुक्त विहारियांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.