Skip to main content

जीवनमान

उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 18/09/2018 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
(खनिजांचा खजिना : लेखांक ७) या अंतिम लेखात आपण ५ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. मॅग्नेशियम : हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे. आहारातील स्त्रोत: हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते. शरीरातील कार्य मॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते.

काम हे काम असतं!

लेखक फुटूवाला यांनी सोमवार, 17/09/2018 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात रात्री झोपेत असताना एक काॅल आला मी: हॅलो क्ष: अरे फोटूवाले १७ तारखेला आपल्याला जालनाला जायचंय. मी: ओके चार्जिंग नसल्यानं फोन बंद पडला लगेच. :( काय झालं काय माहित पण काॅल हिस्ट्रीतून नंबरही गायब झाला. ताबडतोबीची नोंद म्हणून मी कॅलेंडर वर नावाऐवजी जालना लिहीलं.कालपर्यंत मला रिकन्फर्मचा काॅल आलाच नाही. आज पहाटे साडेचार वाजता काॅल आला.आवरलं का विचारायला! मी म्हटलं २० मिनीटं आहेत अजून, कुठे येऊ?

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 16/09/2018 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

डिजीटल डिजीटल

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 15/09/2018 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

खनिज-खजिन्यातील रंगीत धातू

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 10/09/2018 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
(खजिन्यांचा खजिना : लेखांक ६ ) लेखमालेच्या या भागात आपण लोह, तांबे आणि जस्त या तीन रंगीत धातूंबद्दल जाणून घेऊ. लोह शरीरातील लोह हे मुख्यतः हिमोग्लोबिन या लालपेशीतील प्रथिनात साठवलेले असते. हिमोग्लोबिनवर स्वतंत्र लेख मी यापूर्वीच लिहिलेला आहे. तो इथे आहे : https://www.misalpav.com/node/41474. त्यात लोहाचे स्त्रोत वगैरे माहिती विस्ताराने आहे. त्याव्यतिरीक्त असलेली लोहाची माहिती आता देतो. लालपेशीचे आयुष्य साधारण १२० दिवस असते. शरीरात रोज २०० अब्ज लालपेशी मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात.

फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 03/09/2018 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
(खनिजांचा खजिना : लेखांक ५ ) सूक्ष्म पोषण घटकांपैकी दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले हे खनिज. विविध प्रसारमाध्यमांतून आपल्यासमोर फ्लुओराइडयुक्त टूथपेस्टच्या जाहिराती सतत आदळत असतात. त्यातून आपल्याला फ्लुओराइडच्या महत्वाची जाणीव होत असते. निसर्गात ते माती, विशिष्ट खडक आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांत आढळते. अल्प प्रमाणात ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास मात्र तापदायक ठरते. त्याचा सर्वांगीण आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत १.

कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 27/08/2018 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
( खनिजांचा खजिना : लेखांक ४ ) आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो. कॅल्शियम हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.

संडास.

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 23/08/2018 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
संडास नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास. काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात. शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!! एकवेळ माणूस दोन दिवस उपाशी राहील पण संडासला गेल्याशिवाय राहणार आहे का? अर्धा जीव होईल त्याचा. शौचाचा त्रास असणारे कितीतरी लोक मी चिडचिड करताना पहिले आहेत.

पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 21/08/2018 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
(नवीन वाचकांनी हा लेख वाचण्यापूर्वी आधी ‘सोडियम’ वरचा लेख जरूर वाचावा: https://www.misalpav.com/node/43167). * * * सोडियमचा भाऊबंद असलेले हे मूलद्रव्यसुद्धा (K) शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे. जरी ही दोन्ही मूलद्रव्ये शरीरात एकत्र नांदत असली तरी त्यांनी आपापला प्रभाव असणाऱ्या हद्दी आखून घेतलेल्या आहेत. मागील लेखात आपण पहिले की सोडियम हा प्रामुख्याने पेशीबाह्य द्रवांत असतो. पोटॅशियमचे मात्र बरोबर उलटे आहे.

सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 15/08/2018 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही सोडियम काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते. सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत व प्रमाण: स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो.