Skip to main content

जीवनमान

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

गोष्टी माणसांच्या

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
तो तसा ऊंचीने बेताचाच,पण अत्यंत कुशाग्र बुद्धीचा.त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात शिकणारी मुलं त्याच्याकडे शंका घेऊन येत.भौतिकशास्त्र आणि गणित हे त्याचे आवडते विषय.... तो तसा गरीब घराण्यातला,पण घराणं सुशिक्षीतांच होतं,त्याचे वडील व्यवसायाने शिक्षक होते.. त्याच्या वर्गातील सर्वच मुले कुठल्या ना कुठल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यास उत्सुक होती.त्यातल्या त्यात बुद्धीमान मुलं ही IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत.आपल्या मित्रांबरोबर हयानेही IIT च्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला.ह्या मुलांना मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं किंवा फ़ारशी पुस्तकही नव्हती त्यांच्या जवळ.म्हैसूर गावातल्या एका दगडी

जागतिक मंदीवर अमेरिकेत २० देशांच्या नेत्यांची बैठक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील आर्थिक मंदीवर चर्चा करण्यासाठी २० देशांच्या नेत्यांची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आमंत्रित केली आहे. आमंत्रित 20 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही बैठक आहे. व्हॉईट हाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबरला आहे. निवडणुकीनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 22/10/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.

एक महत्वाची सूचना...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/10/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉमच्या (मिपा) सर्व सभासदांकरता एक महत्वाची सूचना - मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो. असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास ते येथून त्वरीत उडवून लावले जाईल व संबंधित सदस्याचा आयडी व आयपी ऍड्रेस ब्लॉक केला जाईल.

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

जेट नावाचा हिमनग

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/10/2008 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जेटची कर्मचारी कपात हा सध्या ज्वलंत विषय झाला आहे. अगदी सनसनाटी. जेट - किंगफिशर एकीकरण प्रस्तावापेक्षाही गाजलेला विषय. जेटने माणसे काढली. गाजावाजा झाला. माणसे परत घेतली. संपले. पण हे इतके वरवरचे आणि सहज नाही. मल्ल्या- गोयल भेट. व्यायसायिक साहचर्याची चर्चा. लगोलग जेटने कामगार कपात केली. काही तासातच माध्यमांना माहिती मिळाली. अल्पावधीतच बहुसंख्य नोकरी गेलेले अमराठी असतानाही राज ठाकरे यांना साकडे घालतात; मुळात त्यांना राजचा ठावठिकाणा लगेच मिळतो. ते आपल्या संघटनेला जाब न विचारता थेट मनसे कार्यालय गाठतात. एकुण बरेचसे न पटण्यासारखे दिसत आहे.

इंदौर...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 17/10/2008 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं. त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्‍या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.