Skip to main content

जीवनमान

सीमापाश

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/10/2008 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज

प्लासिबो - समाधान

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 10/10/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्लासिबो - समाधान
प्लासिबो विषयी विचार करता मनात जे आले ते लिहित आहे. आपण अनेकदा प्लासिबो हा शब्द ऐकला आहे. वैद्यकशास्त्रात रुग्णाला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ न देता जेव्हा औषध नसलेला पदार्थ त्याचे समाधान व्हावे म्हणुन देतात तेव्हा त्याला प्लासिबो म्हणतात. रुग्णाचे समाधान करणे हाच त्याचा हेतू असतो आणि बरे होण्याची मनात इच्छा असलेला रुग्ण ते 'फसवे औषध' घेउन बरा सुद्धा होत असतो. माझी आजी म्हातारपणाने थकली होती. तिला सारखे काहीतरी होत आहे असे वाटून डॉरक्टकडे जायचे असायचे.

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 10/10/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ... स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी ! अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ... वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत .... आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा. अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली.

भडकमकर मास्तरा॑चे हार्दीक अभिन॑दन !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 07/10/2008 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
आपले परमप्रिय मिपकर 'भडकमकरमास्तर' उर्फ डॉ. म॑दार जोगळेकर आजपासून 'बाप माणूस' झाले आहेत! आजच त्या॑च्या पत्नी प्रसूत होऊन त्या॑ना (प्रथम) कन्यारत्न प्राप्त झाले आहे! त्या॑चे, त्या॑च्या पत्नीचे व कुटुम्बीया॑चे मनःपूर्वक अभिन॑दन!!

माझाही अनुभव ....(तो प्रसंग कधीच विसरु शकलो नाही...)

लेखक राम दादा यांनी मंगळवार, 07/10/2008 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो..तुमचे अनुभवाचे लेख वाचुन मला माझ्याही जीवनातील एक प्रसंग आठवला..तेव्हा मी लहान होतो...माझी आई मला नेहमी सांगायची कि आपण एखाद्याला मदद करावी..पण मी लहान होतो..जास्त लक्ष देत नव्हतो.पण आईचे संस्कार अंगिकारले होते.. ....दहावीची परिक्षा जवळ आली होती ..फक्त एकच दिवस बाकी होता..आदल्या दिवशी मी दिवसभर घराबाहेर निघालो नाही..काही महत्वाचे मुद्दे वाचुन काढ्ले..डोक्यामध्ये फुल टेन्शन्..परिक्षेचा पहिला दिवस उजडला..आईने सकाळी लवकर उठवले..बाहेरच्या चुलीवर मस्तपैकी पाणी गरम केले..छान आंघोळ केली..पहिला पेपर मराठीचा होता..त्यामुळे जादा दडपण नव्हते.. हायस्कुल घरापासुन बरोबर ६ किमी अंतरावर

धनाढ्य एकवीशी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 07/10/2008 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा) जय धन मान सकळ सुखसागर माया वसत त्रीखंडी निरंतर पैसा पैसा पैसा पैसा दिसतो ऐसा, आहे कैसा? लपविला जर टॅक्सची खासा काळा शार बने मग पैसा भरता सरकाराऽचे देणे शुभ्र धन नांदे अभिमाने हिरवा रंग नोटांचा तुमच्या नयनी दिसे झणी लोकांच्या काळ्या नोटा, दिली सुपारी लाल रंग मग धन ते धारी रंगबिरंगी अती पैसा वरचा परीटाकडून शुभ्र करायचा पैसा अपुला रोड भासतो दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो खोटी नाणी, चपळ फ़िराई तांब्याची मोडीत विकाई पेटीत ठेवून कोऱ्या नोटा तुकडेवाल्या जोडून वाटा पैसा नश्वर, आरोप खोटा! शाश्वत आहे प्लास्टीक नोटा उधारीचा तो पैसा प्लास्टीक जपून ठेवती पैसा बॅन
Taxonomy upgrade extras

अपवाद

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 07/10/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
वोक हार्ड रुग्णालयातील वैद्यकिय तपासणीचा दिवस. आमच्या आस्थापनेत सर्व कर्मचार्‍यांना वर्षातुन एकदा वैद्यकिय तपासणीचा आग्रह असतो, न गेलात तर तुमची मर्जी. साहेब म्हणाले, जा; आम्ही गेलो. एकट्याला फार वैताग येतो तेव्हा बरेचजण दोघे-तिघे ठरवुन एकत्र जातात. मीही माझ्या एका वरिष्ठ सहकार्‍यांबरोबर संधान साधले होते आणि आम्ही सकाळीच दाखल झालो.

चल मेरी वेस्पा..

लेखक देवदत्त यांनी रविवार, 05/10/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.
जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो. वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती.