मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनमान

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

सरपंच ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी, समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे... या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..! गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...! आपला, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर. मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा.

आठवणी

मनीषा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु?

माझा निबंध ते अनुदिनीपर्यंतचा प्रवास

देवदत्त ·
निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व. शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती.

मिपा - अभिरूची कट्टा....(पोथी)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचे वार्ताहराकडुन शनीवार श्रावण कृष्ण सप्तमी शके १९३० पुण्यपत्तन मोडकी बातमी ( ब्रेकिंग न्यूज) आज वडगाव धायरी येथे एक भव्य मिपा सदस्यांचे जंक्षन फ़ंक्षन झाले त्यावेळी काही सदस्यांस उत्खनन करताना एक दूर्मीळ हस्तलिखीत सापडले. हे हस्त लिखीत पोथी स्वरुपात असुन त्यात आष्चर्य म्हणजे मिपा सदस्यांच्या मेळाव्याचे वर्णने चक्षुर्वैही सत्यांशासह वर्णीले आहे, मूळमजकूर अर्धमागधीत आहे. या शोधाबद्दल सर्वत्र मिपा सदस्यांत तसेच पुणपतनातात एकच कौतुहल निर्माण झाले आहे.

इनोदी आणि कारुण्यपूर्ण

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बिहार सरकार चे नवे धोरण पौष्टीक अन्न उंदीर खा. उपासमारी टाळा. सकाळ मधील ही बातमी वाचा http://esakal.com/esakal/08202008/Sampadakiya83E73329AB.htm बिहारचे आदिवासी कल्याणमंत्री जितन राम मांझी यांनी राज्यातील जनतेला उंदीर खाण्याचे आवाहन केले आहे बिहारी जनतेला सरकारमधील मंत्र्याने अशा प्रकारचे आवाहन करावे हे प्रशासनाचा कारभार किती बेअकलीपणे चालविला जात आहे हे दिसुन येते. देशात लोक पुरेसे अन्नधान्य मिळत नसल्याने अर्धपोटी, उपाशी राहत आहेत. धान्यटंचाईवर नियंत्रणासाठी उपाय योजले जातात. बिहारच्या धान्य गुदामांमध्ये होणाऱ्या साठ्याची नासाडी उंदरांमुळे अधिक होते आहे.

एक सुवर्णयोग !!!

वैशाली हसमनीस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात.... कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'ए. आय. एम. एस. टी(एम्स्ट)'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनऊलाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते.

आता काय करावं? नसत लचांड... :(

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अगदी अनपेक्षितपणे एका वेगळ्याच समस्येत फसलोय. साधारण दोन वर्षापुर्वी मारुती ट्रू-व्हॅल्यू मधून सेकंड-हँड कार घेतली आणि ती चांगली चालली आहे . काल रजिस्टर पोस्टाने कोल्हापुरच्या हातकणंगले (? गावाचे नाव नक्की महित नाही) गावाहून पोलिसांकडून पत्र आले -- त्यात एका अपघाताचा उल्लेख आहे (तारीख आणि नक्की काय झाले त्याचा उल्लेख पत्रात नाही) आणि त्यासंदर्भात कागदपत्रे आणि गाडी घेऊन हातकणंगले इथे बोलावले आहे. मी गाडी कधीही पुण्याबाहेर नेली नाही, तसेच मी घेतल्यापासून तिला कुठलाही छोटा-मोठा अपघात झाला नाही. अर्थात मी घ्यायच्या आधी झाला असेल तर काही माहित नाही.

आवाहन

राघव ·
जयालागी ध्यास, नामाची आस, कोण श्रीमंत दास, तयावीण. भावाची प्रचीती, राम स्वयें सांगाती, प्रेमाची महती, वर्णावी किती!! रामाचे पायी, जया चारी धाम, विचारांचे काम, तयासी कैसे. मोजावे कशास उरलेले दिन, नामी समाधान, आनंदी असावे. राम ठेवी जोवर, त्याचे असावे तोवर, अन् निघावे सत्त्वर, हाक येता! नामी राहावे मन, नाम असावे प्राण, मुमुक्षूचे आवाहन, सगळ्यांसी. मुमुक्षू [टिप: ही कविता आधी दुसरीकडे याच नावाने प्रकाशीत केलेली आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]