ज्योत प्रकाश देते बरोबर पण ती अंधार दूर करते हे महत्वाचे.
मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटते बरोबर पण दर्शन घेतल्यावर
देवाचा आशीर्वाद मिळतो हे महत्वाचे.
वृक्ष सावली देतो बरोबर पण तो पक्षांचा निवारा आहे हे महत्वाचे.
मायबाप आपल्याला वाढवतात बरोबर पण त्यात विधात्याचा हात असतो हे
विसरून चालणार नाही हे महत्वाचे.
अक्षरामधून शब्द तयार होतो शब्दातून अर्थ निघतो अर्थामधून आनंद मिळतो
असे अर्थबद्ध शब्द हृदया पर्यंत पोहोचवणे महत्वाचे.
सुविचार वाचल्याने आनंद खात्रीने मिळतो पण तो सुविचार अंगी बाणवण्याचा
प्रयत्न करणे महत्वाचे.
संगीत ऐकल्याने श्रवणाचा आनंद तर मिळतोच पण काही क्षण तरी आपल्याला
दु:खाचा विसर पडतो हे महत्वाचे
सहलीचा आनंद आपण सर्वजण घेतोच पण पर्यावरणाच रक्षण करणं महत्वाच.
फुलाचा गंध आनंद देतो बरोबर पण प्रत्येक फुलाचा गंध वेगळा असतो हे महत्वाच
लहान मुले आपल्याला आनंद देतात हे बरोबर पण त्यांच्यावर चांगले संस्कार
होणे महत्वाचे.
अनिल आपटे
वाचने
2143
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या लिखान वाचुन छान
सुंदर.....
>>सुविचार वाचल्याने आनंद
सुंदर प्रकटन
ज्योत प्रकाश देते बरोबर पण ती
प्रकाश देऊन अंधार दूर न करणारी गोष्ट
In reply to ज्योत प्रकाश देते बरोबर पण ती by विजुभाऊ
आनंद