Skip to main content

जीवनमान

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

(राया मला अनफ्रेंड करू नका)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 01/09/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका आधुनिकोत्तर तरुणीची ही दारूण फेसबुककथा आहे. तरुण अन् तरुणी पूर्वी प्रत्यक्ष बागेत वगैरे भेटत. आजकालच्या व्हर्च्युअल विश्वात ते फेसबुकाच्या फार्मव्हिलमध्ये भेटतात. अशाच एका तरुणीला, आपल्या कवितेच्या नायिकेला एक तरुण भेटला. वॉल फोटो वगैरे तपासायचे कांदेपोहे झाल्यानंतर रीतसर फ्रेंड रिक्वेस्ट झाली. एकमेकांना त्यांनी बघितलं नव्हतं. तरी वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली. तिने त्याला आपल्या अकाउंटचा पासवर्ड दिल्यानंतर मात्र चित्र पालटलं.
काव्यरस

पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/09/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी चल ग राणी जोडीला ये ग गावूया गावरान गाणी पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ|| विहिर दगडी रहाट लाकडी विजमोटरीनं भरतूया पाणी पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ|| कोरस (फक्त मुलींचा आवाज) : पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ|| पानकळा ह्यो आला, सारं शिवार फुलवून गेला वाटाणा चवळी भुईमुंग गाजर, रताळी अन मुळा पिकं पोटरीला आली आता किटनाशक चला फवारा हातपंप देवून दांडा हातात घे ग, जवळ नाही कुणी पाटापाटानं ग पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||१|| दुभती म्हैस गाभण गाय, शेरडू

अप्रतिम हैद्राबाद !

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 31/08/2011 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात हैदराबाद ( आंध्रपद्रेश) येथे जाण्याचा योग शेवटी जुळून आलाच. :) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जाण्याचा बेत होता. आता रमजानचा मुहूर्त पाहून ही भेट शक्य झाली. या धावत्या भेटीचा हा धावता वृत्तांत. हैदराबाद ! - हैदराबाद असं केवळ ऐकून होतो. वाचून होतो. बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन पाच नवीन शाह्या (शाही चे अनेकवचन) तयार झाल्या होत्या त्यात आपल्या जास्त ओळखीचे म्हणजे विजापूर, अहमदनगर (निजाम), बिदर, बेरार (वर्‍हाड) आणि गोवळकोंडा (कुतुबशहा) असे होते. यातील गोळवकोंडा म्हणजे आताचे हैदराबाद. अर्थात गोवळकोंड्याचा किल्ला आजही आहे आणि तो शहराच्या पश्चिमेस आहे.

मोक्ष

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 31/08/2011 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी? एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...

पावसाचा दरोडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 31/08/2011 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचा दरोडा आला सोसाट्याचा वारा उठलं धुळीचं रिंगण झाडझाडोरे हालता गेल सारं रान पिंजून || बांधावर आम्ही उभे आधार एकमेकांना दोघे तवाच ढग आले दाटून गेलं आभाळ फाटून || थेंब पावसाचे मोठे द्वाड अंगावर बसे वादीचा चाबूक जवा पाहिजे तवा नाही जवा नको तवा यायची खोड || विजा चमकून भिती घालती काही आगाव भुईला टेकती वंगाळ भिती मनाला खायी जिवासाठी आसरा शोधू पाही || उघडा सारा रानमाळ नव्हतं कुणाचं छप्पर ठिपक्यावानी झाड लिंबांच सावली देत उभं र्‍हातं || तेवढा तोच आधार तेचा आडोसा घेतला त्याखाली वल्ले होतो थेंब जोराचे चुकवत || एकाएकी आक्रीत झालं सन्नकन आला
काव्यरस

फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी

लेखक शुचि यांनी मंगळवार, 30/08/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?" माझ्या प्रश्नार्थक चेहेर्‍याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम." यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते.