Skip to main content

जीवनमान

जात जात जात

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 29/05/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात. जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात. जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात. शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात. फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात. ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात. नालायकांच्या नालायकीची आधार असते जात. अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते ज
काव्यरस

भला उसकी कमीज मेरे कमीज......

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 25/05/2012 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेली साठ-सत्तर र्वष चाललेल्या डिर्टजंट वॉरचा आढावा घेतल्याशिवाय टिनोपालच्या कथेचा अध्याय वाचता येणार नाही. १९५९ साली हिंदुस्थान लिव्हरने सर्फ बाजारात आणले आणि बकेट वॉशची पद्धत सुरू झाली. स्वस्तिक केमिकल्सचा डेट नावाचा एक डिर्टजट ब्रँड सोडल्यास सर्फच्या स्पर्धेत कुणीच नव्हतं. सत्तरीच्या दशकात निरमा नावाच्या ब्रँडने हिंदुस्थान लीव्हरची झोप उडवली. सर्फची शुभ्रतेची मक्तेदारी संपली. ‘दूध सी सफेदी निरमा से आये’ या ओळीनं सर्फचा ब्रँड रिकॉल संपवून टाकला. ज्यावेळी सर्फ १२-१३ रुपये किलोने विकलं जायचं तेव्हा निरमाची किंमत तीन रुपये किलो होती. छायागीत आणि सोबत निरमाची जाहीरात.

हे धंदड तत्तड...पगार अजूनच वाढणार

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 24/05/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! २०१२ मध्ये भारतातल्या नोकरदारांचे पगार ११.९ टक्क्यांनी वाढणार!! http://www.dayandnightnews.com/2012/02/indian-employees-to-get-11-9-sal… धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

दक्षिणायन

लेखक अमृत यांनी बुधवार, 23/05/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
'एक्कड की सार?' ऑटोवाल्याचे शब्द कानावर पडले तसा मी भानावर आलो. 'सार... मिटरसे चलते सार?' 'हा जुबिली हील्स जाना है चलो' ऑटोत बसलो तसा परत मुसळभार पाऊस सुरू झाला. काल दिवसभरापासून याने पिच्छा पुरविला होता. २७ तासांचा शिणवणारा प्रवास त्यात कडी म्हणजे तिनहीवेळा जेवणात खावा लागलेला 'राइस', सोबतीला कुणीच नाही आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा घेणारी ट्रेन अरेरे सगळच 'सोनेपे सुहागा'. गेल्या महिनाभरापासून या राइसने नाकी नऊ आणले होते. त्रिवेंद्रमचं एक महिन्याचं ट्रेनिंग कसं पटकन संपलं काही पत्ताच लागला नाही. या काळात ट्रेनिंग कमी आणि संपूर्ण केरळचं टुरिंग मात्र मस्त झालं.

धर्म आणि लोकसंख्या

लेखक मराठे यांनी मंगळवार, 22/05/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला जर कोणी विचारलं की धर्माचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध आहे का? आणि कसा? तर मला वाटतं बरीच लोक एका क्षणाचाही विलंब न लावता तावातावाने कसे क्ष धर्माचे लोक लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहेत यावर तावातावाने बोलायला लागतील. काही जरा जास्त समजूतदार लोक लोकसंख्या धर्मावर नव्हे तर आर्थिक स्थानावर अवलंबून आहे असं म्हणतील. पण जर एकून जागतीक लोकसंख्या, धर्म, लोकांचं सरासरी उत्पन्न या सगळ्या गोष्टी विचारात घेउन एक तक्ता आखला तर एक वेगळंच चित्र डोळ्यापुढे येतं. हँस रॉसलिंग हा अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स मधे रमणारा एक अवलिया.

काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 21/05/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा 'देवदास' आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती. 'पण मला तर आवडला बुवा' एक कन्या म्हणाली. 'काय आवडले तुला?' असा प्रश्न विचारताच 'कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.' कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही मिनिटे भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला.

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह

लेखक यकु यांनी रविवार, 20/05/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले.