Skip to main content

जीवनमान

श्रावण मोडक स्मृती : एकत्र जमुया!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 31/05/2013 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
(हे असलं कधी श्रावणच्या संदर्भात लिहीन याची कल्पनाही केली नव्हती! :( ) *** श्रावण गेला. सत्य बलवान असते आणि ते स्वीकारणे भागच असते. गेल्या काही वर्षात तो सगळ्यांनाच माहित झाला. पण तो त्या ओळखीच्याही बाहेर खूप होता. किंबहुना, त्याच्यासारखा हरहुन्नरी, चतुरस्त्र, लोकसंग्रह असणारा माणूस असा कोणत्याही एका पैलूत सामावू शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, लेखक, पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, माणूस, मित्र... हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत होतेच. या आपल्या मित्राचं हे बहुपेडी व्यक्तित्व साजरं करण्यासाठी आपण सगळे मिळून एक छोटासा कार्यक्रम करत आहोत.

अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज

लेखक साळसकर यांनी रविवार, 26/05/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.

कार्या लयात असताना.... ;)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/05/2013 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर .... कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे, केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे, क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे... असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात.
काव्यरस

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 24/05/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.

ट्यूब लाईट खाणे, केसाने ट्रक ओढणे वगैरे

लेखक संचित यांनी बुधवार, 22/05/2013 20:44 या दिवशी प्रकाशित केले.

तस प्रकरण नवीन नाही. इतक्यात youtube वर विडीओ पहिला आणि विषय परत आठअला. आपण उस खात नाही तेव्हढ्या सहज पणे हा मनुष्य ट्यूब लाईट खातो हे बघा https://www.youtube.com/watch?v=vQXhpqkg8WY. आपण दाताने जिभेला चावले तर २-४ दिवस दुसर काही खाणे जमत नाही. आपल्याला फक्त नासलेले दुध पिले म्हणून फूड पोइझनिन्ग होते. पण हे असले अघोरी माणस कसे काय कोण जाणे काहीही करण्याची तयारी ठेवतात, या अवलीयांच्या पोटात काय लोखंड, अलुमिनियम वितळवणाऱ्या भटया असतात कि काय कोण जाणे? तस पाहिलं तर हे लोक काहीपण पचवण्याची ताकद ठेवतात.

बोट किंवा बस लागणे

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 22/05/2013 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील बर्याच लोकांना बोट किंवा बस लागते. म्हणजे काय होतं? बोट किंवा बस एका जागी उभी असते तेंव्हा काहीच होत नाही पण ती जेंव्हा हलू लागते तेंव्हा थोड्यावेळाने चक्कर येते. पोटात ढवळून येते आणि उलटीची भावना होते किंवा उलटी होते. हे असे का होते याचे मूळ आपल्या कानाच्या आत असते कानाच्या आत अर्ध वर्तुळाकृती नलिका, utricle आणि saccule (पिशवी) हे तीन अवयव असतात. या अर्ध वर्तुळाकृतीनलिका तीन मितीत (थ्री डाय मेन्शन) आपल्या मेंदूची परिस्थिती काय आहे याची मेंदूला सतत माहिती देत असतात.

जय परशुराम...जय वामन!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/05/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.
काव्यरस

ती गेली तेव्हा...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 20/05/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आई जाऊन एक वर्ष झालं.जखमेवरची खपली निघावी तसं काहीसं वाटत होतं सतत. तसं पाहिलं तर अखेरचे काही महिने तिचं अस्तित्व फक्त "असणं" इतकाच होतं. डोळे ,कान केव्हाच काम करायचे थांबले होते. आणि स्मरणशक्ती- तिने ही काढता पाय घेतला होता. या सार्‍यात ती तिच्या मनातले काहीच सांगू शकली नाही. कधी कधी वाटतं, कसं वाटलं असेल हळु हळु असं अंधार गुहेत जाताना? आठवणीची एक एक पाकळी मिटताना? या जगापासून दूर खेचलं जात असताना तिच्या मनाने, शरिराने किती आकांत केला असेल! वाईट वाटतं की किती प्रयत्न केला तरी आम्ही तिच्यापर्यंत पोहचतच नव्हतो. मधे एक अदृश्य पोलादी पडदा असावा तसं होतं.

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 17/05/2013 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो.