Skip to main content

जीवनमान

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/07/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. || ॐ || दि. २७ एप्रिल २०१६ ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही.

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची?

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.

रहाट

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू झालं कोंबडं आरवलं बामनाला जाग आली सडा सारवन पंचारती धडाडून चूल पेटली घुगऱ्या पुरण पोळी पहिला निवद अंबाबाईला मग येडाय रुकड्याय माळावरचा म्हसोबा शेवटून बाभळीखालचा वेताळ खांद्यावर जानवं हातात परात नैवैद्याची रिकामी, उदबत्तीचा धूर सुगंधी केवडा रामप्रहरी, रांगोळीतला मोर आणि हळदीकुंकू उंबरठ्याशी, शेणाचे गोळे ताटलीभर निवद वळचणीला, उनउन लाप्शी प्रसादाला बामन देवळात गेला घंटानाद अखंड दुग्धाभिषेक साडी चोळी खण ओवाळणी बाकी निर्माल्य, कपाळाला अष्टगंध पवित्र, याखेपेस गणपती वाटणीचा? नंदीबैलावर डोळा चिल्लर खुर्दा देवीचा 'वार' जणू दिवाळी दसरा फूलात फूल जास्वंदाचं मोगरा चमेली शोधून सापडेना सिता

मी बाई होते म्हणुनी .. भाग -११

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 02/07/2016 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’ 'हेच आपलं स्वयंवर कसं होईल, - मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती आणि ताई पण आल्या.

वात्रटिका - पे कमिशन

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 30/06/2016 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही. बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी. बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे दिनोंं कि सुरुवात झाली.

मी बाई होते म्हणुनी - भाग -१०

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 27/06/2016 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

मनातले माझ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी रविवार, 26/06/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी आज आशेचा किरण शोधु लागले.......
काव्यरस