Skip to main content

जीवनमान

लग्न..एक लोक कथा..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 08/08/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न..एक लोक कथा.. ....................................... एकाचे लग्न परगावातील मुली बरोबर ठरले.... व-हाड मुलीच्या गावाला निघणार असते..घरात लगबग चालू असते.. घरात म्हातारी आजी असते..लग्नाच्या धामधुमीत तिच्या कडे कोण लक्ष देणार?

धर्म, विज्ञान आणि समाज

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/08/2016 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर ह्या धाग्याला प्रतिसाद म्हणून लिहीत गेले परंतू ते लांबलं. म्हणून स्वतंत्रच टाकतेय. तरिही त्या धाग्याशी संबधीत असल्याने सुरुवात बदलत नाही. एक डोंबिवलीकर म्हणून मुविंच्या उद्वेगाशी सहमत. पण एक नागरिक म्हणून या गोंधळाची जबाबदारी आपल्याकडेही येते असं मला तरी वाटतं. त्याबद्द्ल थोडंसं (१) मी बर्‍याच वर्षांपासून कचरा वाटेत टाकणार्‍यांना थोडं सुनावते. त्यासाठीची भाषाही आवर्जून चांगली वापरते. कधी कधी कचरा टाकणारी व्यक्ती शरमेने गप्प बसते कधी "तुम्हाला काय करायचयं" म्हणत अंगावर येते.

बेटी बढाओ!... कशाला?

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 05/08/2016 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी आठ महिन्यांनी जगभर महिला दिन साजरा केला जाईल. महिलांच्या संरक्षणासाठी, सबलीकरणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देणारी भाषणे ठोकली जातील... वर्षानुवर्षे महिला दिनी हेच घडत आले आहे. त्यामुळे, येऊ घातलेल्या महिला दिनाचे चित्र यापेक्षा वेगळे असणारच नाही. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने एक घोषणा दिली. ‘बस्स झाले. आता सहन करण्याचे दिवस संपले, महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ठोस कृतीची वेळ आली आहे!’ ... त्याला तीन वर्षे झाली. कृतीची वेळ आली म्हणजे नेमके काय झाले, आणि त्या वेळी कोणती कृती केली गेली, असे प्रश्न मात्र अजूनही पिंगा घालतच आहेत.

थोड्क्यात वळख

लेखक विखि यांनी गुरुवार, 04/08/2016 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात कराय्च्या आधी थोड्क्यात वळख करुन देतो. काही महीन्यान पुर्वी जाला वर 'मीसळ' वर माहीती गोळा करत होतो.चुकुन हीथ आलो, आन लागली चटक इथली. ईथला भट्कन्ती हा विषय एव्ढा आवडला की तिथली सगळी पान वाचुन काढली. मी सवता हाडाचा भटक्या असल्यामुळ हावर्यागत ते वाचुन टाकल. हळुहळु त्याच्या बाजुला असलेल चर्चा, पाकक्रुती, साहीत्य वाचाय लगलो. इथ्ल्या चर्चा बी चान्गल्याच रन्ग्त्यात. जमल तेवढ वाचल. मग मला बी कायतरी ल्ह्याव वाटु लागल. पन माझ अस वाट्न म्हन्जे एखाद्या ५० किलो च्या नवशिक्या पैल्वान नी डायरेक्ट खुल्या गटाच्या पैल्वानाला खिजवल्या सारख झाल.

रिओ ऑलिम्पिक २०१६

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/08/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.

नको भुलू जाहिरातींना !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 02/08/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते.

एन्टरप्रेन्युअर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 31/07/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

असेच काहितरी सुचलेले- फोटो.

लेखक राजू यांनी शुक्रवार, 29/07/2016 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?" माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले. दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती. तर वर्षातून दोन-तीनदा मिळणारे कपडे जिथे मुश्किलीने मिळायचे तिथे कॅमेरा कोठून येणार आणि फक्त कॅमेराच नाही तर त्याला लागणारा रोल व त्यानंतर निगेटिव्ह डेव्हलप साठीचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. असो म

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

लेखक विकास यांनी गुरुवार, 28/07/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.