Skip to main content

हे ठिकाण

श्रद्धांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/04/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.

दमलो बुवा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/03/2009 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
जरा कुठे पाच सहा-तास ऑफलाईन असावं आणि येऊन पाहावं तर किमान ५/६ तरी नवे लेख, कविता आणि त्याला प्रत्येकी किमान ३०-३५ प्रतिसाद आलेले पाहायला मिळातात! अरे यार पब्लिकला एवढं लिहायला आणि ते वाचकांना ते वाचून प्रतिसाद लिवायला टाईम तरी केव्हा भेटतो तेच समजत नाय! :) आम्ही हे सगळं केव्हा वाचणार, केव्हा प्रतिसाद देणार, ते काय समजत नाय बा! छ्या, हल्ली मिपाचं हे चित्र पाहूनच 'दमलो बुवा!' असं म्हणायची वेळ येते! :) असो.. आपला, (दिवसेंदिवस कामधंद्यात पार गुरफटत चाललेला!) तात्या.

वक्तृत्वाचे कथन..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 25/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन.. नमस्कार मंडळी, सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत) असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता.

आनंद यादवांचा राजीनामा...

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 17/03/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
'कलेचे कातडे' पांघरुन सुद्धा 'संतसूर्या'ने चटका दिला 'माउली'शीच घेता 'झोंबी' वारकर्‍यांनी झटका दिला.

आभार मिपा व मिपाकरांचे

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 13/03/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव आणी मिपाकरांचे चे आभार कसे व्यक्त करु अस प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता आणी डोक्यात ही कल्पना आली. रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा मराठमोळ्या माणसांना फक्त मिपाचाच आधार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! काव्य, चर्चा, साहित्याचा अनमोल असा ठेवा संगे कौल,कलादालन आणी पाककृतींचा मेवा लहानथोरांसाठी हे मराठीचे अक्षय भांडार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! कोणी न वाटे इथे परके जरी आले कधी प्रतिसाद तिरके भावाबहिणीचे गोड भांडण, तसे एखाद्या काव्याचे विडंबन किती आपुलकी, जिव्हाळ्याची इथे बहार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! चुकुन कुठे कंपुबाजीची तक्रार, कधी तंट
Taxonomy upgrade extras

<<खवव्यनी>>

लेखक देशपांडे१ यांनी मंगळवार, 10/03/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्रतिक्रीयांच्या नकाशांवरून निरीक्षतांना कंपूच्या ख्.व. म्हणाल्या, "काथ्याकूट वरच्या सदरात (..) लिखान, वाचलेस का ? तिरके प्रतिसाद आले का पहायचे आहे." आपल्या संकेतस्थळावर कंपूच्या प्रतिसादांची वाट पहातांना चिंटूने न राहून एक कौल पाडला. "लेख न वाचता +१ ..+२.. सहमत, हि कंपूबाजीच ना ?" त्यात केवढं मोठं सामान्यज्ञान होतं. धाग्यावरचे स्कॅनकेलेले लेख वाचतांना वचकातला एक त्रस्त विचारतो, "जरा हे समजून सांगता का?" आणि त्याने धाग्यावर स्कॅनलेल्या लेखाचा आढावा घेतला. हलके घ्या ;-) सन्मय देशपांडे
Taxonomy upgrade extras

क्षमस्व..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 10/03/2009 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर भरभरून लिहिणार्‍या मिपाकरहो, सध्या आम्ही पोटापाण्याच्या उद्योगामागे व दोन टायमाची भाकरी कमावण्यामागे प्रचंड व्यग्र आहोत.. अनेक मंडळी मिपावर भरभरून लिहीत आहेत, नवे नवे लेखन वरचेवर येत आहे हे आम्ही पाहतो आहोत. ते लेखन वाचणे किंवा त्याला प्रतिक्रिया देणे तर दूरच राहिले परंतु एखादा लेख उघडून पाहायला सध्या आम्हाला वेळ नाही.. मिपाच्या संग्रहात मोलाची भर घालणार्‍यांचे लेखन उघडूनही न पाहणे हे मालक या नात्याने आम्हाला शोभत नाही याची जाणीव आहे परंतु तूर्तास अजून तरी टाईम भेटेल असं वाटत नाही.

महाजालावर मराठीचा जय हो

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 09/03/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
{पुर्वप्रकाशीत्-सदरचा लेख ६ मार्च २००९ रोजीच्या सकाळ वृत्तपत्राच्या कोल्हापुर आव्रुतीत मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख वृत्तपत्रात येणार हे माहीत असल्याने सर्व संकेतस्थळे दीलेली आहेत ,यातील बरीचशी मिपाकराना माहीत असण्याची शक्यता आहे. हा लेख आपण येथेही वाचु शकता. http://farm4.static.flickr.com/3314/3340207823_baf982819d_b.jpg}
महाजालावर मराठीचा जय हो
इंटरनेटला जोडलेला संगणक..

एक विचार... :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 06/03/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार - बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे! जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्‍हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे! यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.