सुपारी

लेखनविषय:
मी सुपारी घेतो. माणसं मारण्याची !... पण एक सांगतो , मी असं उगाच कोणाला मारत नाही . तर मी पैसे घेऊन खून पाडतो .आता कळलंच असेल तुम्हाला, मी एक मुडदे पाडणारा धंदेवाईक खुनी आहे म्हणून. लोकांचे वेगवेगळे धंदे असतात. उल्टे – सीधे ! समाजाला ते माहितीही असतं . त्यांना छुपी मान्यताही असते .मग आम्हीच काय घोडं मारलंय ? माझाही हा धंदाच आहे. असाच एक डॉन आहे ,त्याची मोठी गॅंग आहे, त्याचे अनेक धंदे आहेत. त्यातलाच हा एक - माणसं मारायचा . त्याचंही रुटीन असतं. तो काय करतो, रुटीनपेक्षा वेगळं काम आलं तर तो त्याच्या गँगच्या पोरांना सांगत नाही .मग तो माझ्यासारख्यांना अशी कामं देतो. मी त्याच्या गँगमध्ये नाही.

बाईची जात

लेखनविषय:
बाईची जात --------------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची वेळ होती. हवेत धुकं होतं अन गारवा . अंगाला गार लागत होतं. शांताबाईने गरमागरम चहा केला होता. नऊवारी नेसणारी ,काळी सावळी शांताबाई कृश होती. पन्नाशीची असूनही परिस्थितीमुळे जास्त वाटायची बिचारी ! बंटी मोबाईल बघत होता. आजकाल तो सारखाच मोबाईलवर असे. कोणीतरी हाक मारली म्हणून तो चुकून मोबाईल तसाच ठेवून बाहेर गेला. शांताबाईने त्याच्या जागेवर चहाचा कप ठेवला. आणि तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं . ती चपापली.

मिसळपाव .कॉम (मिपा)चे काम कसं चालतं?

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, गेली १३ वर्षे आपलं मिसळपाव.कॉम संकेतस्थळ अव्याहत सुरू आहे. लोकांना मराठीत व्यक्त होता यावं आणि मराठी लोकांशी गप्पा मारता याव्या व चर्चा करता यावी या साध्या हेतूने मिसळपाव.कॉम सुरू झाले होते. तेव्हाच्या म्हणजे २००७ मध्ये आंतरजालावर मराठी सहज लिहीता यावी व सहज व्यक्त होता यावे ही सुध्दा प्रेरणा होती. मिपा गेल्या काळात अनेक उतार चढावांतून गेलंय. आणि अनेक लोक सुरूवातीपासून येथे आहेत. आज येथे लिहीतोय ते नवीन आलेल्या सदस्यांना मिसळपाव.कॉमचे काम कसे चालते हे कळायला हवे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.

मै एक चिराग बन जाऊं

लेखनविषय:
प्रथमता समस्त मिपाकरांची माफी, या अनेक महिन्यांमध्ये मला मिपावर येता आले नाही..लिहिण्याच सोडा काही वाचता ही आले नाही. मागे एकदा सांगितल्या प्रमाणे काम आणि नविन टेक्नॉलॉजी मुळे वेळ मिळणे खुप अवघड आहे, India deserves better चे पण पुढचे भाग लिहायचे राहिलेच आहेत, विषय आहेत पण लिहिन वेळ मिळेल तसे.. तुर्तास एक साधेसे...

डॉल्फिन्स-बालकथा

लेखनविषय:
चित्रक यक्षाच्या कथा -------------------------------- डॉल्फिन्स --------------------------------------------------------------------------------------------- (घरात अडकून पडलेल्या मुलांसाठी ) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ सोनाली कारमधून मागे पळणारी हिरवीगार दाट झाडं पहात होती. तिला कधी एकदा पोचतोय, असं झालं होतं. बाबांना जोडून सुट्टी आली होती. म्हणून त्यांनी कोकणात जायचं ठरवलं होतं. दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर- डॉल्फिन्स पहायला ! त्यांना पोचायला रात्र झाली .

लगीनघाई

लेखनविषय:
लगीनघाई ------------------------------------------------------------------------------------------------ शिवानीचं लग्न मोडलं होतं - हुंडयामुळे ! ... समाज शिक्षित झाला ; पण सुशिक्षित नाही. अजूनही नाही. मुली शिकल्या. विचार करू लागल्या. घराबाहेर पडल्या. नोकरी करू लागल्या .पण अजुनही मुलीची बाजू पडतीच . हुंड्याचा प्रश्न अजूनही ज्वलंतच ! आईबापांना कर्जात घालणारा . प्रसंगी खड्ड्यात घालणारा. अभिराज एक चांगला मुलगा होता. इंजिनीअर. उत्तम नोकरी आणि पगार असलेला . देखणा आणि टापटीप राहणारा. मुख्य म्हणजे लग्नासाठी अगदी योग्य उमेदवार असलेला. स्थळं बघण्याची सुरुवात झाली.

ऊब

लेखनविषय:
लेखनप्रकार
ऊब ----------------------------------------------------------------------------------------------------------- सूर्याची किरणं धुक्याच्या हातात हात गुंफून हळूहळू खाली उतरत होती. थंडीचे दिवस होते. असह्य, बोचरी थंडी होती. नकोशी ! हाडं गोठवून टाकणारी. त्याने डोळे उघडले. थंडीच्या कडाक्याने त्याला रात्रभर झोप नव्हती. एक चादर -कितीशी पुरणार ? त्याचा आत्ताच कुठे पहाटे डोळा लागला होता. तो फुटपाथवर उठून बसला. त्याने कराकरा एकदा डोकं खाजवलं आणि अंगावरची चादर बाजूला केली. तो एक भिकारी होता ! त्या फुटपाथवरच राहणारा.

बोर्डाची परीक्षा

लेखनविषय:
लेखनप्रकार
बोर्डाची परीक्षा बालकथा - वयोगट मोठा -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मँगो मस्तानी पिताना माझ्या डोळ्यांत पाणीच आलं !... तुम्ही म्हणाल कसं काय ? मँगो मस्तानी तिखट होती का तिचा घोट घेताना ठसका लागतो ? थांबा , तुम्हाला अख्खी स्टोरीच सांगतो. दहावीची प्रिलिम झाली , रिझल्ट लागला आणि मी स्वतःच दचकलो. मला पासष्ठ टक्के पडले होते. फक्त. तसे ऐंशीपर्यंत पडायला हवे होते. तेवढा मी आहे बरं का ! हे झालं माझं . पण आमचे बापूसाहेब !
Subscribe to हे ठिकाण