भारतीय संदर्भ चौकटीची आवश्यकता
भारतीय समाजातील वाढते घटस्फोटांचे प्रमाण आणि भाकड जनावरांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे प्रश्न यांत काही परस्परसंबंध आहे काय असे विचारले तर साहजिकच नकारात्मक उत्तर येईल. पहिला विषय हा मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांविषयीचा आहे. तर दुसरा जरी काही प्रमाणात भावनिक आणि सांस्कृतिक असला तरी त्यात प्रमुख अंग हे आर्थिक स्वरूपाचे आहे. या दोन विषयांत सकृतदर्शनी तरी काहीही सामायिक दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय, त्यांचे आनुषंगिक प्रश्न, ते सोडवण्याच्या पद्धती आणि त्यातून मिळणारी उत्तरे हे परस्परांपासून अत्यंत भिन्न असतील असा कोणी निष्कर्ष काढल्यास ते चूक म्हणता येणार नाही.
मिसळपाव