Skip to main content

धोरण

आंतरजातीय विवाह

लेखक निकुंज यांनी मंगळवार, 22/03/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

खुन्या

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 19/03/2016 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
विलवडे गावातील सगळी मंडळी आज देवळात एकत्र जमली होती . एका मोठ्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गहन चर्चा सुरू होती . भुस्कूटे बाबा भयानक संतापला होता . भुसकुटे बाबा गावातील फार मोठा मांत्रिक होता . देवर्षी बाबाचा दरारा फार मोठा होता ... पण याच भुसकुटे बाबाचा थोरला मुलगा रमानाथ आत्यंतिक वेदनेत तळमळत गावातील सरकारी दवाखान्यात पडला होता ,आणि गावावरचे हे संकट निवारण्यासाठी गावाची बैठक देवळात सुरू झाली होती ... याचे कारण असे की रमानाथ कॉलेज ला शिकायला होता . कॉलेज गावातून 20 किमी लांब होते . पहाटे 5.00 वाजताची एस टी पकडून तालुक्याच्या गावात जावे लागायचे ...

मोदीभक्त आम्ही...

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी बुधवार, 16/03/2016 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा!
काव्यरस

पाण्यासाठी दाही दिशा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 13/03/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यात दुष्काळाचे सलग चौथे वर्ष सध्या आपण भोगतो आहोत. अनेक शहरांमध्ये आत्ताच पाण्याची बोंब उडालेली आहे. पुण्यासारख्या आणि नाशिकसारख्या, ठाण्यासारख्या एरवी पाण्याच्या बाबतीत सुखी राहिलेल्या शहरांमध्येही आठवड्यांतून दोन दिवस कधी तीन दिवस पाणी येणार नाही अशी स्थिती उद्भवलेली आहे. आणि आत्ता आपण फक्त मार्चच्य मध्यावर आलो आहोत! पुढचा पाऊस सुरु होऊन तलाव धरणांतील पाणी साठा उचावण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा किमान अवधी आहे. काळ तर मोठा कठीण आला अशीच ही स्थिती आहे.... अशा वेळी पाण्याच्या साऱ्या नव्या जुन्या योजना आठवल्या तर नवल नाही.

एका हाताने दुष्काळ गाडणारा 76 वर्षांचा ढाण्या वाघ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 07/03/2016 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत आपण मिपावर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल अनेक लेख, कथा, कविता आपण बघितल्या आहेत आणि त्यावर गरमागरम चर्चाही झाल्या आहेत. या आत्महत्या अत्यंत दु:खदायक आहेत आणि त्याबाबत त्वरीत व दूरगामी असे दोन्ही प्रकारचे उपाय होणे जरूरीचे आहे याबाबत दुमत नाही. यासंबंधी दुष्काळनिवारण योजनांवर नादखुळा यांनी शेततळ्यांच्या प्रकल्पाच्या माहितीची अनेक शेतकर्‍यांचे अनुभव असलेली प्रबोधक लेखमाला लिहिली आहे. या पार्श्वभूमीवर "ABP माझा" ने प्रसिद्ध केलेली आणि व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी एक कथा नजरेस आली. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी ही कथा वाचली असेल.

नाव सोनीबाई आणि ................

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 07/03/2016 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

मोदी सरकारच्या नवीन योजना

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप इंडिया- या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल. वेक अप इंडिया- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल.

शब्दांची ताकद

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

क्रिकेट शौकीन ग्राहकाचा ग्राहक न्यायालयातील षटकार !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 26/02/2016 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं.  त्याचं असं झालं, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ३१ जानेवारी २००२ रोजी भारत वि. ऑस्ट्रेलिया असा एक दिवसाचा क्रिकेट सामना होणार होता. हरसिमरनसिंग संधू हा क्रिकेटचा जबरदस्त शौकीन! त्यामुळे त्याने लांबच लांब रांगेत उभं राहून प्रत्येकी दोन हजार रुपयांची चार तिकिटे स्वतः व आपले तीन मित्र यांच्यासाठी खरेदी केली.

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.