Skip to main content

छायाचित्रण

छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 21/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.

डोळ्याचं पारणं फेडा! ... अजुन काय काय ...?

लेखक baba यांनी शुक्रवार, 19/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... पण छान असतात... ह्या सदरामध्ये आपल्याला अजुन कोण कोणती छायाचित्रे पहावयाची ते इथे सान्गावे..... आपली इच्छा कुणीतरी पुर्ण करेल ही आशा बाळ्गतो.. त्याच बरोबर जर एखाद्याला वाटत असेल की आपले एखादे छायाचित्र मुखप्रुष्ठावर यावे.. तर ह्याचि काय सोय आहे का? मला खालील विषयावरिल छायाचित्रे पहायला आवडतिल.... पर्वत रान्गा ग्रामिण जीवन धार्मिक स्थळे आकाश - अन्तराळ अँनिमेटेड

गणपती विसर्जन सोहळा - पुणे

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 18/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..... आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला. पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे. याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे. तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते. मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम

रंग बदलताना (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 16/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावरून उतरून लाल मातीच्या जमिनीवर येताच मातीचा रंग अंगावर धारण करणारा सरडा. तोंड , मान, गळा, पुढचे पाय वगैरे लाल झालेले आहे. मागचे अंग भुरकट आहे; तो रंग बहुधा झाडावर असताना झाडाच्या खोडात मिसळुन जायला सोयिस्कर असावा. अंगावरचे खवले चिलखताची आठवण करुन देतात तर पायाच्या नख्या अणकुचीदार शस्त्रासारख्या दिसतात. पळताना एकवार चोहोकडे पाहणार्‍या डोळ्यात 'सावधान' चे भाव आहेत.

माझेही काही फोटो...

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 12/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मी काढलेले काही मॅक्रो, साधे फोटो शेअर करतोय, बर्‍या-वाईट प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या -
  • इस रंग बदलती दुनियाँमे...
  • फूल ही फूल खिल उठें...
  • जियों मेरे लाल!

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व ३

लेखक मिंटी यांनी शुक्रवार, 12/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सवाई गंधर्वचे आणखी काही फोटो आज टाकत आहे..... उस्ताद सुजाद खान : - उस्ताद अमजद अली खॉं यांचे सुपुत्र अयानअली बंगश :-