राम राम मंडळी,
आजपर्यंत गाण्याबजावण्याच्या दुनियेत खूप मुशाफिरी केली. ती करत असताना अनेक जुनी-दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, इतिहासाची साक्षिदार असलेली जुनी-दुर्मिळ प्रकाशचित्रे माझ्या संग्रही जमा होत गेली. त्यातली काही प्रकशचित्रे आज इथे देत आहे. ह्या प्रकाशचित्रांचे श्रेय त्या सर्व अज्ञात प्रकाशचित्रकारांना. परंतु त्यावरील शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी अर्थातच तात्या अभ्यंकरांची..!
१) ॐ भास्कराय नम:
पं भास्करबुवा बखले. संगीताच्या दुनियेत खरोखरच ज्याला भास्कर म्हणावं असा गवई, उतम गुरू. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तीन घराण्यांवर हुकुमत.