Skip to main content

चित्रपट

क क क क कमीने

लेखक अनामिक यांनी रविवार, 16/08/2009 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
फ्पॉयलर अलर्टः या परिक्फणात(?) कथा न फांगण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे. आताच 'कमीने' बघून आलो. आता मी हा चित्रपट का पाहिला अफे विचारणार अफाल तर उत्तर आहे केवळ करमणूकीकरता आणि फनीवारचा वेळ चांगला जावा म्हणून. कालपरवाच्या पेपरात ह्या चित्रपटाला चार चांदण्या (कोण तात्यांच नाव घेतंय रे?) मिळालेल्या पाहिल्या आणि जायचं पक्कं केलं. तफा फमिक्फकांनी दिलेल्या चांदण्यांचा आजकाल माझ्यावर काही परिणाम होत नाही.

कभी यह सिनेमा ना देखना..

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 08/08/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडी सिनेमांचा जर्मन रतिब इथल्या टेलिव्हिजनवर, सीडींमधून चालूच आहे अर्थात आता त्याची नवलाई संपली असली तरी कधी तरी एखादा सिनेमा पाहण्याची लहर येते. तसाच परवा त्या जोहरांच्या करणचा 'कभी अलविदा ना कहना..' लागला होता . नेहमीचेच खेळगडी , खानांचा शाहरुख, मुखर्जींची राणी , पिता बच्चनबरोबर पुत्र बच्चन (फ्री), वाडिया की झिंटांची प्रिती इ. इ... सिनेमाचे नाव केकता सारखेच करणही क ने सुरु करतो बहुदा आणि 'म्याच'नेच सिनेमा ओपन करायचा असतो असा त्याचा (गैर)समजही असावा बहुतेक..

परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 27/07/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?” आहे. “महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“ असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो. “महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “ हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत.

चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 25/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे. भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात.

'हाय...' लताबाईंचा!

लेखक प्रदीप यांनी शुक्रवार, 24/07/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्य्या गांधाराच्या लेखावरून काही इतर, विषेशतः लताबाईंच्या हिंदी चित्रपटगीतांमधील विशेष स्थानांची आठवण झाली. ती त्यातील 'हाय..' ह्या शब्दाच्या अत्यंत परिणामकारक उच्चारावरून. लताबाईंचे गाणे अगदी अंडरप्लेईंगचा उत्तम नमुना आहे. कोठेच भाव उतू चालले आहेत असे दिसत नाही.

डेट्रॉईट्मध्ये ब्लॅक अँड व्हाईट चा कार्यक्रम

लेखक अमेरिकन त्रिशंकू यांनी बुधवार, 15/07/2009 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी कृष्णधवल चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम तारीख आणि वेळ : रविवार, २ ऑगस्ट २००९, दुपारी ४:०० ते ७:०० ठिकाणः नोव्हाय हायस्कूल २४०६२ टाफ्ट रोड, नोव्हाय, मिशिगन ४८३७५ गायकः हृषिकेष ऱानडे, विभावरी आपटे, जितेंद्र अभ्यंकर, सावनी रविंद्र संचालनः राहुल सोलापुरकर दिग्दर्शन मिलिंद ओक तिकिटांसाठी संपर्क: (१५ आणि २० डॉलर्स) पराग वाकणकर (दुवा क्र. २) - २४८-७३५-०२०३ (pwakankar@gmail.com) शौनक आठवले (दुवा क्र. १) - ७३४-९४४-६२६६ (bnwmi@yahoo.com)

चिल्ड्रन ऑफ हेवन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 30/06/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही. बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते. अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.

चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 16/06/2009 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपावर कम्युनिस्ट विरुद्ध इतर असा एक जबरदस्त कलगीतुरा रंगला होता. पब्लिक नुसतं तुटून पडलं होतं. बरीच राळ उडली होती. त्या निमित्ताने लहानपणी वाचलेली रशियन भाषेतून (बहुतेक अनिल हवालदार यांनी) मराठीत भाषांतरित केलेली पुस्तकं, एका मित्राच्या घरी (त्यावे वडिल सीपीआयचे मेंबर) येणारे सोविएत साहित्य (मासिकं, पुस्तकं) वगैरे आठवणी जाग्या झाल्या. मग काही दिवस जालावर कम्युनिस्ट विचारसरणी, सोविएत युनियन, पोलादी पडदा वगैरे बद्दल वाचत होतो. शीतयुद्धाच्या काळात पोलादी पडद्यामागचं जग खरंच कसं होतं हे कुतूहल तेव्हाही होतंच.