वीर्यदानाचे महत्व पटवणारा - विकी डोनर :)
जॉन अब्राहम, अभिनय कशाशी खातात हे न कळणारा एक बॉलीवुडी पेहेलवान, जेव्हा एक चित्रपट प्रोड्युस करणार हे वाचले होते तेव्हा हसू आले होते. खरंतर त्याचा हा सिनेमा डाऊनलोड करूनच बघितला असता. पण सध्या मद्र देशी काहिच विरंगुळा नसल्याने आणि १२-२ असे लोड शेडिंग असल्यामुळे एका मॉल मध्ये गेलो (A.C. मध्ये २ तास घालवायला). बघण्यासारखी काहीच 'प्रेक्षणीय स्थळं' नसल्यामुळे भयंकर बोर झाले म्हणून PVR मल्टीप्लेक्स कडे मोर्चा वळवला. तिथे त्यावेळी फक्त विकी डोनर ची तिकीटे करंटला मिळत होती. म्हटले चला १२० रूपये जॉनच्या बोडक्यावर घालूयात काही पर्याय नाही.
मिसळपाव